शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सामान्य रुग्णालयात फुलले औषधीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:31 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध औषधी वनस्पतींचा समावेश असलेले ‘ग्रीन स्क्वेअर’ निर्माण करून रुग्णालयाच्या परिसरात औषधी वन फुलवले आहे.

ठळक मुद्देग्रीन स्क्वेअरची अभिनव संकल्पना : विविध वनस्पतींची रुग्णांना ओळख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध औषधी वनस्पतींचा समावेश असलेले ‘ग्रीन स्क्वेअर’ निर्माण करून रुग्णालयाच्या परिसरात औषधी वन फुलवले आहे.आरोग्याला उपकारक ठरणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची ओळख रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना व्हावी तसेच रुग्णालयाच्या परिसरात हिरवाईतून चैतन्याचे वातावरण पसरावे, या हेतूने हा उपक्रम हाती घेल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.ओवा, तुळस, मोसंबी, लाजाळू, लेंडी पिंपरी, कढीपत्ता, राई, पुदिना, काटेकोरांटी, डाळिंब, हळद, लिंबू यांसारख्या विविध औषधी वनस्पतींचे उद्यान रुग्णालयात निर्माण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी हिरवाई निर्माण केली आहे. या औषधी वनस्पतींचे गुणधर्म सांगणारे फलकही लावले आहेत. बाल संगोपनासाठी आवश्यक आहार, औषधी वनस्पती व भाज्या यांची माहिती या उद्यानाच्या माध्यमातून मातांना सहजपणे मिळते. नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, परिचारिका, तंत्रज्ञ व सर्व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. या औषधी वनात नेमक्या कुठ्ल्या वनौषधी लावायच्या, त्याबाबत वन आणि सामाजिक वनिकरण विभागाची मदत घेण्यात आली.परिसर हिरवागारजिल्हा सामान्य रूग्णालयातील परिसर या औषधी वनाने हिरवागार झाला आहे. भरउन्हाळ्यात मोठमोठ्या वृक्षांची पानगळ होत असताना या वनौषधींची निगा राखली जात असल्याने हा संपूर्ण परिसर आल्हाददायी झाला आहे.रुग्णालये म्हणजे औषधी, सिरिंजचा कुजका वास, अस्वच्छता असलेले ठिकाण ही धारणा दूर करण्यासाठी ‘हिरवा कोपरा’ ही संकल्पना सुचली. अधिनस्थ यंत्रणेलाही ती रुचली. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा ताण थोडा दूर व्हावा, औषधी वनस्पतींची माहिती मिळावी, यासाठी हे औषधी वन साकारले.- डॉ. श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :medicineऔषधं