शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईपेक्षा अमरावतीत पेट्रोल झाले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

राज्यात परभणी येथे १०७.८९ रुपये, तर त्यानंतर अमरावती येथे १०७.०३ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल घ्यावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर रविवारी १०७.०३ रुपये लिटर याप्रमाणे पेट्रोल विकण्यात आले. स्पीड पेट्रोल १०९.९१ रुपये दराने विक्री सुरू आहे. डिझेलसाठी ९८.४० रुपये मोजावे लागत आहेत. धारणी शहरातसुद्धा १०७. २४ रुपये लिटर दराने पेट्रोल विकण्यात येत आहे.

ठळक मुद्देवाहनचालक हैराण, कोरोनानंतर इंधन दरवाढीचे नवे संकट, २ रुपये ३ पैसे मोजावे लागतात जास्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्ग उद्भवल्यानंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ हळूहळू वाढत जाणाऱ्या चंद्राच्या कलेप्रमाणे होत आहे. मात्र, त्यात एकदाही घट झालेली नाही. अमरावतीत मुंबईपेक्षा पेट्रोल महाग विकत घ्यावे लागत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. इंधनाच्या दरवाढीबाबत असंतोष असला तरी त्यावर नियंत्रणाच्या मुद्द्यावर सत्तापक्षाच्या पुढाऱ्यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. धारणी शहरातदेखील १०७.२४ रुपये लिटर दराने पेट्रोल विकले जात आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना पेट्रोल पंपावर मात्र चढ्या दराने पेट्रोल-डिझेल विकत घ्यावे लागत आहे. केंद्र सरकारने अगदी अलीकडे २ जुलै २०२१ रोजी पेट्रोलवर प्रतिलिटर ३५ पैसे वाढविले होते. त्यामुळे रविवारी मुंबई येथे १०५ रुपये, तर अमरावती येथे पेट्रोल १०७.०३ रुपये प्रतिलिटर होते. राज्यात परभणी येथे १०७.८९ रुपये, तर त्यानंतर अमरावती येथे १०७.०३ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल घ्यावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर रविवारी १०७.०३ रुपये लिटर याप्रमाणे पेट्रोल विकण्यात आले. स्पीड पेट्रोल १०९.९१ रुपये दराने विक्री सुरू आहे. डिझेलसाठी ९८.४० रुपये मोजावे लागत आहेत. धारणी शहरातसुद्धा १०७. २४ रुपये लिटर दराने पेट्रोल विकण्यात येत आहे. ‘एक देश - एक दर’चा नारा केंद्रात लावला जात असताना, मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त आणि अमरावती येथे महाग कसे, असा सवाल सामान्यांनी उपस्थित केला आहे.

सर्वसामान्यांचे जगणं महागलंपेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने याचा परिणाम वाहतुकीच्या दरावर मोठा प्रमाणात झाला आहे. वाहतूक भाडे महागले असून आपसूकच जीवनावश्यक वस्तू, साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाचे दर वाढताच मालवाहतुकीचे भाडे वाढले आहे. त्यामुळे अन्नधान्य, भाजीपाला, किराणा, खाद्यतेल चढ्या दराने विकत घ्यावे लागत आहे. पेट्रोल, डिझेल वाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे महागल्याचे चित्र आहे. 

ईंधन दरवाढीचा नक्कीच सर्वसामान्याच्या जगण्यावर परिणाम झाला आहे. भाववाढीसाठी हे प्रमुख कारण आहे. अगोदर वाहनात १५०० रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर ते तीन दिवस चालायचे. आता दोन दिवसात पेट्रोल संपते.- कमलाकर पायस, ग्राहक

धारणीत पेट्रोलचे टॅंकर  गायगाव डेपोतून अकोट, अंजनगाव, परतवाडा सेमाडोह मार्गे येत असून, हा प्रवास २०० किमीचा आहे. भाडे जास्त दराने लागत असल्याने पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे.समीर पटेल, संचालक, भारत पेट्रोलियम धारणी

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल