शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कीटकनाशक सुरक्षित फवारणीचे यंत्र विकसित, मृत्यूचा धोका टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 18:08 IST

कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन दगावण्याच्या बऱ्याच घटना विदर्भात घडल्या आहेत.

- इंदल चव्हाणअमरावती : कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन दगावण्याच्या बऱ्याच घटना विदर्भात घडल्या आहेत. नवतंत्रज्ञामुळे आता सर्वसामान्य शेतकरीही या यंत्राचा वापर करू शकणार असल्याने सुरक्षित फवारणीचा प्रयोग यशस्वी होऊन मृत्यूचा धोका टळणार, असे 'मल्टी नोझन अ‍ॅग्रो स्प्रेअर' प्रो. राम मेघे जुने इंजिनीअरिंग कॉलेजच्या भाग ३ चे टॉम-१ चे विद्यार्थी अथर्व उमक आणि चैतन्य इंझाळकर यांनी तयार केले आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत आविष्कार - २०१८ स्पर्धा बुधवारपासून सुरू झाली, ती गुरुवारी संपणार असून, यामध्ये विविध जिल्ह्यांतील महाविद्यालयांतर्गत विद्यार्थ्यांनी आधुनिक तंतत्रज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात कसा सार्थकी लागेल, याविषयी प्रतिकृतीचे सादरीकरण करण्यात आले. त्यात शेतकºयांना कमी खर्चात, कमी श्रमात अधिक काम होऊन अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होण्याच्या उद्देशाने मल्टी रोटेड अ‍ॅग्रो स्पेअर यंत्र ठेवण्यात आले होते. हे यंत्र सामान्यांतील सामान्य शेतकरी आपल्या सोयीनुसार वापरू शकतो. त्यामुळे आर्थिक खर्चातही बचत होणार आणि मजुराचीदेखील आवश्यक भासणार नाही, अशी या यंत्राची वैशिष्ट्य आहे.असे आहे यंत्रया फवारणी यंत्रासाठी सायकलीचे चेचीस, समोरील चाक, मागे लहान चाक, चीनचाकी सायकलीची हातात पकण्यासाठी मुठ, त्यालाच जोडलेली स्प्रे पंपाची हातात पंपिंग होणारी मुठ, त्याला सुरक्षित गार्ड (नाका-तोंडासह डोळ्यात औषधीचे फवारे जाऊ नये) पारदर्शक राहील. मोठी व लहान फिरव्हिल, त्यावर सायकलीची चेन, आठ एमएमच्या लोखंडी पट्ट्या, आठ एमएमचेच नट-बोल्ट, अँगलवर प्लास्टिकची स्प्रे पंपाची टाकी अशी या यंत्राची रचना आहे.चार हजार रुपयांचं यंत्र घरीहे यंत्र तयार करण्यासाठी किमान चार हजार रुपये खर्च येतो. मात्र, एकदा तयार झाल्यानंतर योग्य पद्धतीने वापर केल्यास ते ५ ते ७ वर्षे सहज चालते. या यंत्रामुळे मजुराचे श्रम वाचणार आहे. खांद्यावर २५ लिटरची टाकी घेऊन केवळ एकाच नोझलने फवारणी करताना अधिक वेळ व त्रासदेखील होतो. परंतु, या यंत्राने मजुराचा त्रास वाचतो. एकाच फेरीत एक ओळीची फवारणी शक्य होते. पीक मोठे झाल्यास नोझल अ‍ॅडजेस्टमेंटची सुविधा यात केलेली आहे. त्यामुळे हे यंत्र सामान्य शेतकरी सहज वापरू शकतो.यंत्राची संपूर्ण माहिती जाणून घेतली. हे यंत्र सामान्य शेतकरीसुद्धा सहज वापरात आणू शकतो. यापासून कीटकनाशक औषधीची बाधा होणार नाही, खांद्याला इजा होणार नाही, अंगावर औषधी सांडणार नाही, अशी रचना यात विद्यार्थ्यांनी साकारली आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ