शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत सिंचनाची सुविधा

By admin | Updated: March 19, 2016 00:16 IST

मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचा स्तर खालावतो आहे. कोरडवाहू शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असते.

शासनाचा निर्णय : उत्पन्नात होणार वाढ, आता मागेल त्याला शेततळेसुमित हरकुट चांदूरबाजारमागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचा स्तर खालावतो आहे. कोरडवाहू शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असते. जलस्तरामध्ये घट होण्याचा विपरित परिणाम शेती उत्पन्नावर झाला आहे. शेतीच्या उत्पादनात वाढ करणे तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहेत. पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी जलसंवर्धन आणि पाणलोटच्या माध्यमातून सिंचनाची उपयुक्तता वाढविण्यासोबत संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. शेततळ्यांच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शेततळे ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी ठरेल. शेततळे कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. त्या शेतकऱ्यांची जमीन शेततळ्यांकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. जेणेकरुन पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी सामुदायिक शेततळे शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा. दारिद्र्यरेषेखालील शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट व प्रथम प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय प्रथम अर्ज करणाऱ्याची प्राधान्यक्रमाने निवड करण्यात येईल. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेमुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना १५ बाय १५, २० बाय १५ व ३० बाय ३० आकाराचे शेततळे घेता येणार आहे. अनुदानाची कमाल मर्यादा ५० हजार इतकी राहणार आहे. यापेक्षा अधिक खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागणार आहे. अधिकाधिक पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रितरीत्या सामुदायिक शेततळे करता येईल. त्यांना मिळणारे अनुदान, पाण्याचा वापर आणि पाण्याची हिस्सेदारी आदींबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून तो अर्जासोबत शेततळे करण्यास इच्छुकशेतकऱ्यांकडे जमिनीचा ७/१२, ८/अ चा उतारा, दारिद्र्य रेषेखालील कार्ड, आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसाचा दाखला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी योजना लाभदायक ठरू शकते.