शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे गंडांतर

By admin | Updated: January 27, 2015 23:26 IST

येथील संजय गांधी निराधार योजनेत धारणी शहरासह तालुक्यातील २५ ते ४० वयोगटातील २ हजारहून अधिक बोगस युवक व महिलांना वयोवृद्धांचा शिक्का व स्वाक्षरीनिशी दाखले देण्यात

राजेश मालवीय - धारणीयेथील संजय गांधी निराधार योजनेत धारणी शहरासह तालुक्यातील २५ ते ४० वयोगटातील २ हजारहून अधिक बोगस युवक व महिलांना वयोवृद्धांचा शिक्का व स्वाक्षरीनिशी दाखले देण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आला आहे. याची दफ्तरी नोंद न घेणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी ओके असल्याचा शेरा दिला आहे. तसेच मंजूर अहवाल देणाऱ्या तलाठ्यांवर महसूल विभागाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यामुळे पूर्ण प्रकरण थंडबस्त्यात आहे.धारणी तहसीलमधील संजय गांधी निराधार योजनेचे पात्र लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवून २५ ते ४० वयोगटातील अपात्र लोकांना लाभ दिल्याचा प्रकार उघडकीस आला. शासनाची फसवणूक करणाऱ्या नायब तहसीलदार सोळंके यांचेसह तीन कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी निलंबित करून त्यांच्यावर आणि बोगस लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. मात्र, २५ ते ४० वयोगटातील व्यक्तींना ६० ते ७० वर्ष वयाचे असल्याचे खोटे दाखले देणारे येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांवर अद्याप पर्यंत कारवाई झाली नाही. तसेच निराधार योजनेत लाभार्थ्यांची निवड करतांना त्यांच्या संपुर्ण कागदपत्रांची पाहणी करून ओके अहवाल शिक्का व स्वाक्षरी देणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात नायब तहसीलदार व तीन कर्मचारी सामील नव्हे, तर वयाचे खोटे दाखले देणारे वैद्यकीय अधीक्षक, तलाठी, संबंधित बँकेचे शाखाप्रबंधक, रोखपाल सुध्दा सहभागी आहे. मात्र नायब तहसीलदार व तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी कारवाई झाली व पूर्ण प्रकरण थंडबस्त्यात आहे. परंतु प्रकरणारचे खरे सूत्रधार आणि तहसील कार्यालयात रात्रंदिवस वावरणाऱ्या दलालांवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.