शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाल दिसली, कीटक कसे दिसणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 00:08 IST

मनभरीच्या चिवड्यात पाल आढळून आल्याने दाभा येथील ओमजी नमकीनच्या कारखान्यात पालीचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : चिवड्याचे पाकीट 'रिकॉल' केव्हा होणार ?अमरावती : मनभरीच्या चिवड्यात पाल आढळून आल्याने दाभा येथील ओमजी नमकीनच्या कारखान्यात पालीचा वावर असल्याचे स्पष्ट होत आहे. पालीचे जीवन कीटकांवर अवलंबून असल्यामुळे कारखान्यात कीटकांचाही वावर असल्याचे सिध्द होते. चिवड्यातील पाल आकाराने मोठी असल्याने दृष्टीस पडली. मात्र, अत्यंत लहान आकाराचे कीटक कसे दिसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एफडीएने चिवड्याचा माल 'रिकॉल' करण्यास संचालकाला सांगितले आहे. मात्र, अद्यापपर्यंत तो रिकॉल झाला नाही. विजय नगरातील विमल चुडे या महिलेने घेतलेल्या मनभरी चिवड्याच्या पाकिटात पाल आढळून आल्यानंतर एफडीए अधिकाऱ्यांनी मनभरीच्या ओमजी नमकीन कारखान्यावर धाड टाकून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. पाल कारखान्यात शिरण्याचे मार्ग शोधले. एका जागेवरून पाल आत येऊ शकते, ही बाब निश्चित केली. पाल ही वीज दिव्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या कीटक खाऊन जगते. दिव्याच्या अवतीभोवती शेकडो कीटक फिरतात. अख्खी पाल तळली जाऊ शकते, तर शेकडो कीटक चिवड्यात जाणेही शक्य आहे. चिवडा तयार करताना मुरमुरे, फुटाणे, दाणे टाकून एकत्रित तळण्यात येतात. या मिश्रणात गेलेल्या पालीकडेच जर कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर चिवड्यातील कीटकांकडे लक्ष देणार तरी कोण, अशी स्थिती कारखान्यातील व्यवस्थेवरून दिसून येत आहे. पाल ही सर्व प्रकारचे कीटक खात असून तिच्या खाण्यात विषारी व दुर्गंधीयुक्त कीटक असतात. चिवडा बनविताना अख्खी पाल जर मिश्रणात तळली जाऊ शकते, तर चिवड्यात शेकडो कीटकही कसे बरे तळले गेले नसावेत, असा प्रश्न उपस्थित होतो. एकाचवेळी चिवड्याची हजारो पाकिटे पॅक केली जातात. ज्या चिवड्यात पाल आढळून आली, तोच चिवडा अनेक पाकिटात भरला गेला. मनभरीचा चिवडा विदर्भातील अनेक प्रतिष्ठानांतून विक्री केला जातो. हजारो ग्राहकांनी तो विश्वासाने खरेदी केला असावा. विक्री झालेल्या चिवड्याचे हजारो पाकिटे आजही बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. सदर बाधित चिवडा अद्यापही परत बोलविला गेला नाही. यातून कुणाच्या आरोग्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)चिवड्यात तळलेल्या अवस्थेत आढळलेल्या पालीसंदर्भात अद्याप कुणीही माझ्याशी संपर्क केला नाही. असले जीवघेणे प्रकारावर अन्न, औषध प्रशासनाने योग्य कारवाई करणे अपेक्षित आहे. - विमल चुडे, ग्राहक, विजयनगर