शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महिला डॉक्टरांकडून ‘बेटी बचाओ’साठी पथनाट्य

By admin | Updated: September 15, 2016 00:18 IST

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याच्या उद्देशाना शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्यावतीने बेटी बचाओचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला.

गणेशोत्सवात उपक्रम : स्त्री रोग व प्रसुती शास्त्र संघटनेचे आयोजनअमरावती : स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याच्या उद्देशाना शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्यावतीने बेटी बचाओचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन भाविकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने महिला डॉक्टरांकडून नागरिकांना हा संदेश देण्यात आला आहे. 'वंशाचा दिवा हवा' म्हणून काही पालक मुलीपेक्षा मुलांना प्राध्यान देतात. तसेच आजच्या आधुनिक युगातही स्त्री भृ्रण हत्येच्या घटना अनेकदा उघड झाल्या आहेत. त्यातच छुप्या मार्गाने लिंग तपासणी करणारी पालक मंडळी आहे. मात्र, गर्भलिंग तपासणीचा आरोप डॉक्टरावर केला जातो. हा प्रकार बंद व्हावा, मुलींनाही समान दर्जा प्राप्त व्हावा, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी शहरातील काही महिला डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. संचालक आशा ठाकरे, सहसंचालक तसेच सचीव प्रांजल शर्मा, आरती काबरा यांच्या चमुने गणेश मंडळांना भेटी देऊन पथनाट्याद्वारे 'बेटी बजाओ, बेटी पढाओ'चा संदेश दिला. यंदा महिला डॉक्टरांनी शहरातील विविध गणेश मंडळांने भेटी देऊन त्या ठिकाणी पथनाट्य सादर केले. उपक्रमात सहभागी झालेले डॉक्टरसामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पथनाट्याद्वारे बेटी बचाओचा संदेश देण्याची संकल्पना आशा ठाकरे, प्रांजल शर्मा व आरती काबरा यांची आहे. या पथनाट्यात सुयोग्या पानट, चित्रा बनसोड, पूनम बेलोकार, ललिता लोखंडे, शीतल पोटोडे, सोनाली शिरभाते, ललीता डोले, रेवती ढवले, ज्योती अग्रवाल यांच्यासह अन्य डॉक्टरांचा सहभाग आहे.