शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

उत्तीर्ण विद्यार्थिनीला नापासची गुणपत्रिका

By admin | Updated: April 19, 2015 00:20 IST

अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी उत्तीर्ण असतानाही तिला अनुत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एक वर्षाचे नुकसान : विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावरअमरावती : अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी उत्तीर्ण असतानाही तिला अनुत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्यार्थिनाला एका वर्षाचे नुकसान सहन करावे लागले. या प्रकारामुळे पुन्हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. यासंदर्भांत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरु मोहन खेडकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत असलेली रुचा चंद्रकांत भोपाळे हिने शैक्षणिक वर्ष २०१३-१४ साठी सिपना महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तिने प्रथम 'ग्रुप बी'ची परीक्षा हिवाळी २०१३ मध्ये दिली होती. त्यामध्ये रुचा सर्वच विषयात नापास झाली. त्यानंतर तिने रसायनशास्त्र विषय पुर्नमुल्याकंनकरिता टाकला होता. त्यामध्ये ती उर्तिर्ण सुध्दा झाली. त्यानंतर तिने उन्हाळी परीक्षा २०१४ ला उर्वरित गृप बीचे तीन विषय आणि गृ्रप ए ची परिक्षा दिली. तेव्हा सुध्दा ती सातही विषयात नापास झाली. ती प्रथम वर्षाकरिता नापास झाल्याने तिला द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू शकला नाही. उर्वरित विषय काढण्याकरिता रुचाने पुन्हा हिवाळी २०१४ ची परिक्षा दिली. त्यावेळी तिला ग्रुप बीची गुणपत्रिका मिळाली नाही. गुणपत्रिकेसाठी रुचाने विद्यापीठात अर्ज केला होता. मात्र, विद्यापीठाने रुचाचे ग्रुप बीचे सर्व विषय उन्हाळी २०१४ मध्येच निघाल्याचे सांगून तिला उर्तिर्ण झाल्याची गुणपत्रिका दिली. त्यामध्ये रसायनशास्त्र विषयात अनुपस्थिती दर्शविलेल्या ठिकाणी २६ गुण देऊन उर्वरित विषयांमध्ये गे्रस मार्कींगचे समान विभाजन करुन तिला उत्तीर्ण करण्यात आले. या प्रकारामुळे रुचा भोपाळेला मानसिक तणावात आली होती. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे तीचे एका वर्षांचे नुकसान सुध्दा झाले आहे. याप्रकाराची कुलगुरुंनी जबाबदारी स्वीकारून चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्याथी परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भांचे निवेदन अभाविप अमरावती महानगराचे अध्यक्ष स्वप्निल पोतदार यांच्या मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्त्यांनी कुलगुरु मोहन खेडकर यांना सादर केले. (प्रतिनिधी)