शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

परतवाडा बसस्थानकातून पळविले जातात प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 13:01 IST

Amravati News खासगी ट्रॅव्हल्सच्या आपसी स्पर्धेतून पाच दिवसांपूर्वी झालेला राडा पाहता परतवाडा बसस्थानक परिसरात प्रवासी पळविण्याचा खेळ बंद झाला असेल, असे सामान्यांना वाटत असेल, तर ते सर्वथा चूक आहे.

ठळक मुद्देएसटी प्रशासनाला कुणी जुमानेनापोलिसांचा धाक संपला

नरेंद्र जावरे

 लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती : खासगी ट्रॅव्हल्सच्या आपसी स्पर्धेतून पाच दिवसांपूर्वी झालेला राडा पाहता परतवाडा बसस्थानक परिसरात प्रवासी पळविण्याचा खेळ बंद झाला असेल, असे सामान्यांना वाटत असेल, तर ते सर्वथा चूक आहे. तो जीवघेणा खेळ राजरोसपणे सुरूच आहे. बसस्थानकाच्या दोनशे मीटर अंतरापुढे खासगी वाहने लावावीत, हा नियम पायदळी तुडवला जात असून, त्या गळेकापू स्पर्धेतून मोठी अप्रिय घटना घडण्याची भीती वर्तविली जात आहे.

             पूर्वीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला कोरोना काळात प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे एसटीचे अर्थचक्र थांबले. त्यामुळे या बंद काळात चालक - वाहकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे आजही बस गाड्यांमध्ये डिझेल टाकण्याची ऐपत महामंडळाची नाही. या सर्व संकटांचा सामना करीत असताना खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी आपली वाहने थेट बसस्थानक परिसरात लावून प्रवासी पळविण्याचा घाट घातला आहे. याच स्पर्धेतून एका ट्रॅव्हल्सवर प्रचंड दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. ट्रॅव्हल्स संचालकांची ती कृती प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करणारी ठरली आहे. दुसरीकडे सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली अरेरावी कुणाच्या आशीर्वादाने, असा प्रश्न जुळ्या शहरातील नागरिकांना पडला आहे.

शेकडो तक्रारी, केराची टोपली

परतवाडा शहरातून अमरावती, नागपूर, अकोला, पुणे, मध्यप्रदेशच्या खंडवा, इंदूर, बैतूल अशा दूरपर्यंत खासगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात धावतात त्यासाठी असलेले सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. परतवाडा बसस्थानकापुढे या खासगी ट्रॅव्हल्स लावून प्रवासी पळविले जातात. यासंदर्भात परतवाडा आगारातून पोलीस ठाणे, आरटीओ व प्रशासनाकडे शेकडो तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कुठल्याच प्रकारे कारवाई केली जात नसल्याचे वास्तव चित्र आहे.

तोडफोडीनंतरही दादागिरी सुरूच

प्रवासी नेण्यासाठी आपला क्रमांक आहे, यावरूनच हा वाद शिगेला पोहचला होता. मोठ्या प्रमाणात दगडफेक करीत ट्रॅव्हल संचालकांनी दहशत पसरली होती. त्यामुळे पोलीस प्रशासन जागृत झाले आणि वाहन २०० मीटर दूर लावल्या गेली. परंतु, दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा परिस्थिती “जैसे थे‘ असल्याचे चित्र शुक्रवारी दुपारी पहायला मिळाले. त्यामुळे आरटीओ व पोलिसांची हप्तेखोरी की धाक संपला? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

टप्पा वाहतूक कोणाच्या आदेशाने?

परतवाडा अमरावती या मार्गावर सर्वाधिक प्रमाणात खासगी ट्रॅव्हल दिवसभर धावत आहेत. ही टप्पा वाहतुकीची परवानगी आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याने ट्रॅव्हल संचालकांना दिली, हे मात्र अनुत्तरित आहे. याच कारणातून परतवाड्यात मोठा राडा होण्याची भीती वर्तवली जात असून त्यावर कारवाईची मागणी होत आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक