शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

दहिगावात महसूल विभागाचे समांतर प्रशासन

By admin | Updated: June 9, 2014 23:21 IST

तालुक्यातील दहिगाव येथे सोमवारी दुपारी एका घरावर धाड टाकून तहसीलदार प्रदीप पवार यांनी बँकेच्या कर्जासाठी दिले गेलेले बोगस सातबारा व तलाठय़ांचे वेगवेगळ्या गावाच्या नावांचे शिक्के

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव येथे सोमवारी दुपारी एका घरावर धाड टाकून तहसीलदार प्रदीप पवार यांनी बँकेच्या कर्जासाठी दिले गेलेले बोगस सातबारा व तलाठय़ांचे वेगवेगळ्या गावाच्या नावांचे शिक्के आणि शासनाद्वारे वापरले जाणारे गोल सिक्के जप्त केले. दहिगाव येथील सुरेश मेश्राम यांच्या घरातून ही जप्तीची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र बँकेच्या सुर्जीच्या शाखेने महसूल विभागाला या प्रकाराबाबत सतर्क केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तहसीलदारांसोबत अंजनगावचे ठाणेदार गजानन पडघन, मंडळ अधिकारी विनोद अढाऊ व पटवारी प्रवीण गेडाम होते. जप्त करण्यात आलेल्या शिक्क्यांमध्ये अंजनगाव तालुक्यासोबतच  चिखलदरा तहसील कार्यालयातील गावांचाही समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. प्राप्त माहितीनुसार, दहिगाव येथे गट क्र. ६0 व गट क्र. ९४ चे बनावट सातबारा तयार करून त्याद्वारे सुर्जी येथील महाराष्ट्र बँकेत पीक कर्ज प्रकरण तयार करण्यात आले. याप्रकरणी बँक प्रशासनाला संशय आल्याने सातबारा पडताळणीसाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे देण्यात आला. त्यात हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून जप्त करण्यात आलेल्या शिक्यांवरून दहा ते बारा गावांच्या नावाचे शिक्के तयार करण्यात आल्यामुळे या गावाच्या हद्दीतील अनेक बोगस सातबारा वितरीत झाल्याची शक्यता आहे. याच गावातील एका मास्टर माईंड सेवानवृत्त कर्मचार्‍याने यापूर्वी असे बनावट सातबारा तयार करून जिल्हा बँकेला सन २0१0 मध्ये लाखो रूपयांचा चुना लावला होता. पण या प्रकरणात संबंधित सातबारा हे प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींचे असल्याने हे प्रकरण दाबण्यात आले होते. हे प्रकरण दाबल्यामुळेच गुन्हेगार पुन्हा शिरजोर झाले. जप्त केलेल्या सातबारावर कोरडवाहू शेती ही ओलिताची दाखवून त्यावर संत्रा झाडे व केळीचे पीक दाखविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)