शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार विभाग झाला पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:35 IST

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) विभागाकडून ग्राहकांना दिले जाणारे दूरध्वनी अथवा मोबाईलचे देयके आता ई-मेल किंवा मॅसेजद्वारे पाठविले जातील. १ जानेवारीपासून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात असून, दूरसंचार विभागाची वाटचाल पेपरलेसकडे सुरू झाल्याची माहिती बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक सुनीलकुमार अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : आॅनलाईनच मिळणार देयके, कागदी देयके बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) विभागाकडून ग्राहकांना दिले जाणारे दूरध्वनी अथवा मोबाईलचे देयके आता ई-मेल किंवा मॅसेजद्वारे पाठविले जातील. १ जानेवारीपासून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात असून, दूरसंचार विभागाची वाटचाल पेपरलेसकडे सुरू झाल्याची माहिती बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक सुनीलकुमार अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली.अग्रवाल यांनी ही ग्राहकांना नववर्षाची भेट असल्याचा दुजोरा दिला. यापुढे देयके ही बीएसएनएल मार्फत ग्रो. ग्रीन प्रकल्पाअंतर्गत ई- मेल आयडी नोंदणीकृत केले आहे. नोंदणीकृत ग्राहकांच्या ई-मेल आयडीवर पाठविली जाणार आहे. विशेष म्हणजे या देयकांमध्ये १० रूपयांची सुट मिळणार असल्याचे मुख्य लेखा अधिकारी विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.भारत सरकारच्या डिजिटल इंडिया ई-गव्हर्नन्स योजनेतंर्गत झाडे वाचविणे, पर्यावरणाची सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीकोणातून कागदी प्रिन्ट केलेली बीले सर्व ग्राहकांना जी अद्यापर्यत पोस्टामार्फत पाठविण्यात येत होती. ती आता बंद करण्याचा निर्णय दूरसंचार विभागाने घेतला आहे. त्यामुळे टेलिफोन ग्राहकांनी आपला ई-मेल आयडी गो. ग्रीन प्रकल्पांतर्गत नोंदणी करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.शासकीय व निमशासकीय कार्यालयासह आदींनी रेकॉर्ड करता कागदी बिल आवश्यक आहे. त्यांनी गो.ग्रीन मध्ये आपला ई-मेल आयडी नोंदणीकृत करून ई-मेलवर बिल प्राप्त करून घेण्याचे आवाहन बीएसएनएलने केले आहे. ग्राहकांनी मोबाईल क्रमांक बीएसएनएलकडे नोंदणीकृत करून घ्यावे, असे बीएसएनएलने कळविले आहे. माय बीएसएनएल अ‍ॅप डाऊनलोड करून देयकाबाबतचे विस्तृत विवरण ग्राहकांना कळणार असल्याचे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले. बीएसएनएलचे डीजीएम डी. बी. डांगे, पी.एम. धोबे, ए.डी. नांदूरकर उपस्थित होते.टेलिफोन नंबर सांगूनही भरता येणार देयकेछापील कागदी बिले यापुढे ग्राहकांना मिळणार नाही. त्याकरिता पोस्टमास्तर जनरल यांना बीएसएनएलने पत्राव्दारे मोबाईलवरून मॅसेजमधील टेलिफोन बिलाचे देयके स्वीकारावे अशा सूचना दिल्या आहेत. सर्व टेलिफोन ग्राहक बीएसएनएलच्या तसेच पोस्टाच्या सर्व बिल भरणा केंद्रात मोबाईलवरील संदेश दाखवून बिल भरू शकतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.