शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पंढरी शिवारातील ११ दारु कारखाने उद्ध्वस्त!

By admin | Updated: January 24, 2015 00:01 IST

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पंढरी, महेंद्री शिवारातील डोंगरदऱ्यांमध्ये बिनबोभाट सुरू असलेले गावठी दारूनिर्मितीचे ११ कारखाने ...

वरुड : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पंढरी, महेंद्री शिवारातील डोंगरदऱ्यांमध्ये बिनबोभाट सुरू असलेले गावठी दारूनिर्मितीचे ११ कारखाने मोर्शी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी उध्वस्त केले. ही कारवाई सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. कारवाई दरम्यान तब्बल दोन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातपूडयाच्या पायथ्याशी पंढरी, महेंद्री शिवारातील डोंगरदऱ्यांमध्ये मोहा रसायनापासून गावठी दारुनिर्मितीचे ११ कारखाने सुरू होते. याची माहिती मिळताच गुरूवारी राज्य उत्पादन शुल्क विभाग, मोर्शीने या कारखान्यांवर धाडी टाकल्या. यामध्ये ६ हजार ७२० मोहा रसायन, २२४ रबरी टयूब, ५० लीटर चे ५० ड्रम, २० लीटरच्या १५ अ‍ॅल्युमिनियम चरव्या, आणि ३०० लिटर गावठी दारु असा १ लाख ९३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी विभागाचे निरीक्षक शरद लांडगे, भरारी पथकाचे निरीक्षक शंकर रटवे, दुय्यम निरीक्षक मधुकर उईके, राजेश तायकर, राजेश राठोड, शिपाई खाडे, चव्हाण, गावंडे, जयस्वाल, मोकलकर, जाधव, बंगाले यांच्या पथकाने धाडसत्र राबविले. पंढरी तलावाचे मागील बाजूला वर्धा डायव्हर्शनच्या बोगद्यालगत हे दारू कारखाने सुरु होते. तालुक्याच्या आसपास एवढया मोठया प्रमाणात गावठी दारु निर्मितीचे कारखाने सुरू असूनही प्रशासनाला याबाबत कोणतीच माहिती नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या भागात केलेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे. कारवाईमुळे गावठी दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायांवर विशेषत: गावठी दारू विक्रेत्यांवर अंकूश बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सातपुड्याच्या पर्वतराजींच्या आश्रयाने सुरू असलेल्या या अवैध व्यवसायांबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याने गावकऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. अवैध दारूनिर्मितीचे केंद्रच उध्वस्त झाल्याने दारूविक्री आटोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सामान्य नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. (तालुका प्रतिनिधी)घनदाट जंगलाच्या आश्रयाने अवैध व्यवसाय वरूड तालुक्याला सातपुडा पर्वतरागांचे सरंक्षण लाभले आहे. घनदाट जंगल आणि मोठया प्रमाणावर पशुपक्षी तसेच हिंस्त्र प्राणी आहे. परंतु या जंगलांच्या आश्रयाने विविध अवैध धंद्यांना ऊत आला आहे. यावर अंकुश ठेवण्यास प्रशासन हतबल ठरले आहे. धामणधस, भेमंडी, महेंद्री, पंढरी शिवारातील दारू कारखान्यांमुळे गावठी दारुचा ग्रामीण भागात महापूर येत असल्याचे दिसते.