शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पॅनकार्ड क्लबच्या कार्यालयाला टाळे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 00:20 IST

पॅनकार्ड क्लब लिमिटेड या खासगी वित्तीय संस्थेचे स्थानिक कार्यालय चार दिवसांपासून बंद असल्याने हजारो गुंतवणूकदार ग्राहक अस्वस्थ झाले आहेत.

गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता : फौजदारी तक्रारीची शक्यता अमरावती : पॅनकार्ड क्लब लिमिटेड या खासगी वित्तीय संस्थेचे स्थानिक कार्यालय चार दिवसांपासून बंद असल्याने हजारो गुंतवणूकदार ग्राहक अस्वस्थ झाले आहेत. अशातच कंपनीचा संबंधित आणि स्थानिक कर्मचारी वर्ग ‘आऊट आॅफ रेंज’ असल्याने ग्राहक वर्गात संताप व्यक्त होत आहे. क्लब, हॉटेल्स आणि रुमनाईट शेअरच्या माध्यमातून पॅनकार्ड क्लब लिमिटेड या वित्तीय संस्थेने देशभर व्यवसायाचे जाळे विणले. रुमनाईट शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदार मिळवत लक्षावधी ग्राहकांची रक्कम गोळा केली. अमरावतीमध्येही १० वर्षापासून एजंटच्या माध्यमातून हा ‘चेन बिझनेस’ सुरू करण्यात आला. आकर्षक परतावा मिळतो म्हणून जिल्ह्यात सर्वदूरच्या नागरिकांनी पॅनकार्ड क्लबमध्ये गुंतवणूक केली. तथापि पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतरही कंपनीने ग्राहकांची रक्कम परत देण्यास दिरंगाई चालविली आहे. वर्ष-सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदार पॅनकार्ड क्लबच्या बडनेरा रोडस्थित कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. गुंतविलेली रक्कम आणि त्यावरील परतावा मिळविण्यासाठी जंग-जंग पछाडावे लागत आहे. असे असतांना सोमवार ११ एप्रिलपासून कंपनीचे बडनेरा रोड स्थित कार्यालय उघडण्यात आले नाही. कार्यालयीन वेळेत शटरबंद असल्याने ग्राहकांच्या संतापाचा कडेलोट होवू लागला आहे. पॅनकार्ड कार्यालयाचा पत्ता बदलला असून नव्या पत्त्याची प्रतीक्षा करा, असा चिटोरा शटरच्या वर लावण्यात आला. कार्यालय कुलूपबंद असल्याने ‘आपली रक्कम बुडाली’ अशी ग्राहकांची भावना झाली आहे. तर भाडे भरले नाही म्हणून कार्यालय बंद होते, अशा दावा स्थानिक व्यवस्थापनाने केला आहे.