शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विरोधातील लढ्यात चार हजारांवर कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत जिल्हा परिषदेकडील डॉक्टर, आरोग्यसेवक, सेविका, आशा, अंगणवाडी सेविकांसह चार हजारांवर कर्मचारी राबत ...

अमरावती : कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत जिल्हा परिषदेकडील डॉक्टर, आरोग्यसेवक, सेविका, आशा, अंगणवाडी सेविकांसह चार हजारांवर कर्मचारी राबत आहेत. गावाची स्वच्छता, औषध फवारणी, बाहेरून आलेल्या हजारो नागरिकांवर हे कर्मचारी वॉच ठेवत आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ग्राम दक्षता समित्या व जिल्हा परिषदेची आरोग्य व अन्य विभागाची यंत्रणाही या लढ्यात काम करीत आहेत. जिल्हा परिषदेचे डॉक्टर व कर्मचारी जीव धोक्यात घालून अखंडित सेवा देत आहेत. कोरोनाची परिस्थती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेची यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. गावात होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या आरोग्याकडे आरोग्य विभागाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचाऱी वेळोवेळी माहिती घेत आहेत. ग्रामीण भागातील ही सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करते का, यावर जिल्हा परिषदेतील वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्या सर्वांना प्रत्येक तालुक्याची जबाबदारी दिली आहे.

बॉक्स

शंभर रुग्णवाहिका

जिल्हा परिषदेकडे जवळपास शंभर रुग्णवाहिका आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे आदी मिळून ९४ रुग्णवाहिका सेवेत सज्ज आहेत. सर्व रुग्ण्वाहिकांमध्ये रुग्ण दाखल करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी मास्क, हँडग्लोव्ह्ज, सॅनिटायझर तसेच पुरेशा औषधासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा आदींचे वेळोवेळी सहकार्य लाभत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

बॉक्स

अशी राबते जिल्हा परिषद यंत्रणा

ग्रामीण भागात नियमित डॉक्टर १९४, हंगामी डॉक्टर १००, आरोग्यसेविका २५०, सेवक १८०, टीएमओ १४, पर्यवेक्षक ७४, सुपरवायझर १४ यांच्यासह आशा वर्कर २०८१, अंगणवाडी सेविका २ हजार ५३२, मदतनीस २ हजार ३६६, ग्रामपंचायत कर्मचारी १२२० सेवेत आहेत. यासोबत ग्रामसेवकांचेही सहकार्य लाभत आहे.