शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

संक्रमणमुक्तांचे प्रमाण उच्चांकी ९८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३,८३२ नागरिक संक्रमणमुक्त झालेले आहेत. ही ...

अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३,८३२ नागरिक संक्रमणमुक्त झालेले आहेत. ही टक्केवारी ९७.८६ इतकी असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. दरम्यान आठ हजारांवर ॲक्टिव्ह रुग्णांचा उच्चांकी झाल्याने संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्का घसरला होता. मात्र, या लाटेला ओहोटी लागताच पुन्हा संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्का वाढला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार १ जानेवारीपासून जिल्ह्यात ७६ हजार ११५ संक्रमितांची रुग्णांची नोंद झाली, तर याच कालावधीत ७४ हजार ८११ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात २२ एप्रिल २०२० रोजी पहिल्या संक्रमणमुक्त नागरिकांची नोंद झाली होती. या कालावधीत १५ दिवसांच्या उपचारानंतर रुग्णांची दोनवेळा आरटीपीसीआर चाचणी करण्यात यायची. दोन्ही वेळा अहवाल निगेटिव्ह आल्यासच रुग्णाला सुटी दिली जायची. यानंतरही किमान एक आठवडा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहावे लागत असे. त्यानंतर सुधारित गाईडलाईनुसार दहाव्या दिवशी व आता सहाव्या ते सातव्या दिवशी संक्रमिताला डिस्चार्ज दिला जात आहे. त्यानंतर त्याने किमान १४ दिवशी गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

पाईंटर

असे झाले संक्रमणमुक्त

१ जानेवारी : १९०२१

१ फेब्रुवारी : २१,९७९

१ मार्च : २९,५३१

१ एप्रिल : ४४,९१३

१ मे : ५७,५९६

१ जून : ८६,४५७

२७ जून : ९३,८३२

बॉक्स

रविवारी ७२ रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात रविवारी उपचारदरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने संक्रमित मृतांची संख्या १,५५० झालेली आहे. याशिवाय नव्या ३६ पॉझिटिव्हची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९५,८८३ झालेली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने रविवारी ७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध रुग्णालयासह होम आयसोलेशनमध्ये ५०१ रुग्ण असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.