शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

शिक्षकांच्या समस्या सोडविणे आमचे कर्तव्य

By admin | Updated: April 25, 2017 00:09 IST

राज्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविणे हे आमचे आद्य कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार ना.गो. गाणार यांनी केले.

ना.गो.गाणार : शिक्षक मतदारसंघ आमदारांचा सत्कारअमरावती : राज्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविणे हे आमचे आद्य कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार ना.गो. गाणार यांनी केले. स्थानिक संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित शिक्षक आमदारांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.राज्यातील पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातून निर्वाचित झालेल्या आमदारांचा सत्कार येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात पार पडला. शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे, कोकणचे बाळाराम पाटील आदींचे सत्कार करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक अर्चना नेरकर, व्यवसाय शिक्षण सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, उपसंचालक एस.बी.कुलकर्णी, शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव संजय यादगिरे, शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, विजुक्टाचे विभागीय अध्यक्ष अविनाश बोंडे उपस्थित होते. यावेळी आ. विक्रम काळे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. प्रास्ताविकातून शेखर भोयर यांनी शिक्षकांच्या समस्या सर्व आमदारांनी एकत्र येऊन सोडवाव्यात, अशी मागणी केली. कार्यक्रमाला शिक्षक महासंघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.