शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

-तर ‘त्या’ २५ कोटींच्या कामांची चौकशी करु

By admin | Updated: April 16, 2015 00:01 IST

दोन ते अडीच वर्षांपासून थकीत असलेल्या विकासकामांच्या २५ कोटी रुपयांच्या देयकांचे वितरण शिल्लक आहे. ही

नवनियुक्त आयुक्तांचे संकेत : महापालिका कंत्राटदार धास्तावले अमरावती : दोन ते अडीच वर्षांपासून थकीत असलेल्या विकासकामांच्या २५ कोटी रुपयांच्या देयकांचे वितरण शिल्लक आहे. ही कामे खरेच झाली काय? याचा शोध घेण्यासाठी त्रयस्थ एजन्सी नेमून चौकशी करण्याचा पवित्रा नव्या आयुक्तांनी बुधवारी घेतल्याने महापालिका कंत्राटदारांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.महापालिका आयुक्त चंद्रशेखर गुडेवार यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बुधवारी त्यांना भेटणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. याच श्रुंखलेत अमरावती महापालिका कंत्राटदार असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुडेवार यांचे स्वागत केले. यावेळी कंत्राटदार असोशियनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करताना थकीत २५ कोटी रुपये देयकांबाबत विषय छेडला असता आयुक्त गुडेवार यांनी झालेली कामे अस्तित्वात आहेत का, असा सवाल उपस्थित करुन कंत्राटदरांची दांडी उडविली. बांधकाम कशी केली जातात, याचे मला चांगले ज्ञान आहे. महापालिकेत काय सुरु आहे, हेदेखील अवगत असून चांगले कामे केल्यास एका दिवसात देयके देण्याची व्यवस्था करेल, अशी हमीदेखील त्यांनी दिली. मात्र, यापूर्वी झालेल्या विकासकामांची तपासणी करण्याचे ठरविले आहे. त्याकरिता त्रयस्त एजन्सी नेमण्याचा विचार असून जी कामे दोन ते अडीच वर्षांपूर्वी करण्यात आली आहेत, ती खरेच अस्तित्वात आहेत काय? याचा शोध घेतल्यानंतर थकीत देयकाबाबत निर्णय घेणार, अशी तंबी आयुक्तांनी कंत्राटदारांना दिली. नव्या आयुक्तांच्या कारभाराची आगळी झलक बघताच कंत्राटदारही अवाक् झालेत. जुन्या आणि झालेल्या विकास कामांची तपासणी करण्याचे बोलताना आयुक्त गुडेवार यांनी कंत्राटदारांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले. महापालिकेत होणारी कामे ही नागरिक भरत असलेल्या करातून होतात, याचे भान सुद्धा कंत्राटदारांनी ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला. टक्केवारीला लगाम लागेल याची चिंंता करु नका.चांगले काम करा यातच भले राहील, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, हे सांगायला आयुक्त विसरलेत नाहीत. यावेळी नवनियुक्त आयुक्त गुडेवार यांचे कंत्राटदार असोशियनचे अण्णा गुल्हाने, प्रशांत उपाध्ये, राजेश वावरकर, राहुल प्रधान, कुणाल टिकले, अमर भेरडे, कन्हैय्या गुप्ता, पप्पू मालवीय, जीतू पंचघाम, अजय मोहोड आदींनी सत्कार केला.