शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

गाव विकास आराखडे अपलोड करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST

अमरावती : आपले गाव आपला विकास अंतर्गत ग्रामपंचायतींचे सन २०२१-२२ चे गाव विकास आराखडे प्लॅन प्लस पोर्टलवर अपलोड करण्याचे ...

अमरावती : आपले गाव आपला विकास अंतर्गत ग्रामपंचायतींचे सन २०२१-२२ चे गाव विकास आराखडे प्लॅन प्लस पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश सीईओंनी बीडीओंमार्फत सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. याकरिता १५ मार्चची डेडलाईन दिली असून, सदर मुदतीत आराखडे अपलोड न केल्यास जबाबदार संबंधितांवर प्रशासकीय कारवाईचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतर्गत ८४० ग्रामपंचायतींना आपला गाव आपला विकास अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे गाव विकास आराखडे तयार करण्याचे आदेश यापूर्वीच्या जिल्हा परिषद पंचायत विभागाने सीईओंच्या आदेशानुसार दिले आहेत. याच कालावधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात. सोबतच कोरोनामुळे ग्रामसभा व मासिक बैठकीही होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी विकास आराखडे ग्रामसभा व मासिक बैठकीच्या ठरावाअभावी होऊ न शकल्याने विकास आराखडे अपलोड करण्याचे काम थंडबस्त्यात पडले होते. आता ग्रामपंचायतींच्या निवडणुका व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आदींनी कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावविकास आराखड्याची रेंगाळलेली काम तातडीने मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ ते ३० ग्रामपंचायतींचे विकास आराखडे अपलोड झालेले आहेत. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींचे विकास आराखडे अद्याप अपलोड केलेले नाही, अशा ग्रामपंचायतींनी येत्या १५ मार्चपर्यंत गावविकास आराखडे प्लॅन प्लस पोर्टलवर अपलोड करावे, असे निर्देश सीईओंनी दिले आहेत.

कोट

आपले गाव आपला विकास अंतर्गत ग्रामपंचायतींचे सन २०२१-२२ चे गाव विकास आराखडे प्लॅन प्लॅस पोर्टलवर अपलोड करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. याकरिता १५ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत जे आराखडे अपलोड करणार नाही. अशावर नियमानुसार प्रशासकीय कारवाई केली जाईल.

- अमोल येडगे,

मुख्यकार्यकारी अधिकारी