शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार लेखापालाला आदेश :

By admin | Updated: June 15, 2015 00:13 IST

स्थानिक नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांतर्गत धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अचलपूर पालिकेच्या लेखापालाला देण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली विनंती मोर्शी : स्थानिक नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांतर्गत धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अचलपूर पालिकेच्या लेखापालाला देण्यात आले आहे. मोर्शी येथील लेखापालाचे पद रिक्त असल्याने सध्या मोर्शीचा प्रभार अचलपूरच्या लेखापालांकडे आहे. येथील मुख्याधिकाऱ्यांनी धनादेशावर स्वाक्षरी करण्याचा नगराध्यक्षांचा अधिकार काढून घेतला आहे. पुुन्हा स्वाक्षरीचा अधिकार बहाल करण्याची सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली.नगरविकास विभागातर्फे राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकांकरिता महाराष्ट्र नगर परिषद लेखासंहिता २०१३ दिनांक ११ नोव्हेंबर २०१४ पासून लागू केला आहे. नवीन लेखासंहिता लागू होण्यापूर्वी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने बँकेचे व्यवहार केला जात असे. परंतु नव्या लेखासंहितेत नगराध्यक्षांऐवजी लेखापाल आणि मुख्याधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने बँकेचे व्यवहार करण्याची तरतूद आहे. येथील पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षाचे अधिकार काढून घेतले नव्हते. नवनियुक्त मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी नवीन लेखासंहिता लागू करून मुख्याधिकारी आणि लेखापालांच्या संयुक्त स्वाक्षरीने बँकेचे व्यवहार सुरु करण्याचे आदेश दिले होते. मुख्याधिकाऱ्यांच्या या कारवाईविरुध्द सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन नपमध्ये लेखापालाचे पद रिक्त असल्याने हे अधिकार पूर्ववत नगराध्यक्षांना बहाल करण्याची विनंती केली होती. ‘लोकमत’ने २६ मे रोजी याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.मोर्शी : दरम्यान जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सत्ताधाऱ्यांची विनंती फेटाळून लावली. नपमध्ये लेखापालाचे पद रिक्त आहे, अशीच स्थिती जिल्ह्यातील चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, वरुड आणि शेंदूरजनाघाट पालिकांची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या सर्व नगर परिषदांकरिता जिल्ह्यातील ज्या नगरपरिषदांमध्ये नियमित सहायक लेखापाल कार्यरत आहेत, त्यांना अतिरिक्त जबाबदारी देऊन मुख्याधिकाऱ्यांसोबत धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार बहाल केले. (तालुका प्रतिनिधी)