शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागातील वादग्रस्त बदलीच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 22, 2014 23:48 IST

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत वादग्रस्त ठरलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्रालयाने दिले आहेत. येत्या आठवडाभरात चौकशी

अमरावती : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत वादग्रस्त ठरलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कृषी मंत्रालयाने दिले आहेत. येत्या आठवडाभरात चौकशी समिती या प्रकरणाचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती आहे. या चौकशीत प्रशासन अधिकारी शिरसाठ यांची सावध भूमिका राहणार असून बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्त बदली आदेशावर सहाय्यक प्रशासन अधिकारी देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने त्यांना या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याची कृषी विभागात चर्चा आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून राबविण्यात आलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणाचे लागेबांधे थेट कृषी मंत्रालयापर्यंत जोडल्या गेले आहेत. बदलीसाठी घेण्यात आलेल्या निधी खालपासून वरिष्ठ पातळीपर्यंत जात असल्याचीही चर्चा आहे. यापूर्वी कृषी विभागातील नोकर भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली त्यामुळे कृषी विभाग चांगलाच बदनाम झाला आहे. कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत मागील काही दिवसापूर्वी विभागातील ५०५ कृषी सहायक, ११ पर्यवेक्षक, ८ सहायक, ११ वरिष्ठ लिपीक, १८ कनिष्ठ लिपीक, अनुरेखक १० व दोन वाहन चालकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या करताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्यामुळे बदली प्रक्रियेत सर्व नियम धाब्यावर बसवून या बदल्या करण्यात आल्याची ओरड याच विभागातील कर्मचाऱ्यांनी सुरू केली. दरम्यान, याबाबतची तक्रार थेट मंत्रालयापर्यंत पोहचताच अमरावती विभागातील कृषी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेची चौकशी सुरू झाली असून या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच कारवाई होईल.