शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम दक्षता समित्या ॲक्टिव्ह करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST

अमरावती : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवून विविध उपाययोजना राबविण्याची जबाबदारी ग्राम दक्षता समितीवर सोपविण्यात आली आहे. ...

अमरावती : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवून विविध उपाययोजना राबविण्याची जबाबदारी ग्राम दक्षता समितीवर सोपविण्यात आली आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील काही अपवाद वगळता सर्व समित्या लॉक आहेत. याबाबत ‘लोकमत‘ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी निष्क्रिय झालेल्या ग्राम दक्षता समित्या तातडीने ॲक्टिव्ह करण्याचे आदेश अधिनस्त यंत्रणेमार्फत दिले आहेत.

गाव पातळीवर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना आणि आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने दक्षता समित्यांची स्थापना केली आहे. मात्र सध्या जिल्ह्यात काही अपवाद वगळता बहुसंख्य गावात या समित्या नावापुरत्याच उरल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोरोना संदर्भातील उपाययोजना आवश्यक त्या प्रमाणात राबविल्या जात नव्हत्या. परिणामी याच निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. भविष्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच पुढाकार घेऊन दक्षता समित्या ॲक्टिव्ह करणे आवश्यक आहे. माक्सचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच होम आयसोलेशनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून दंड करण्याचा अधिकार या समितीला देण्यात आला आहे. त्यानुसार गतवर्षी नियम मोडणाऱ्या अनेकांवर या समित्यांनी कारवाई केली होती. परिणामी लोकांच्या मध्ये समितीची जरब बसली होती. गतवर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या समित्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून चांगली कामगिरी केली होती. दरम्यान तीन चार महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे समित्यांना मरगळ आली. त्यातच मध्यंतरी जिल्ह्यात अनेक गावांत निवडणुकीचे वातावरण होते. त्यामुळे अनेक ठिकाणी सत्ता बदल झाल्याने गाव कारभारी बदलले. अशातच गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. दररोज वेगाने बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे शासनाने नवीन नियमावली लागू केली. मात्र दुसरीकडे दक्षता समिती निष्क्रिय असल्याचे चित्र आहे.या सर्व बाबीची दखल घेत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्राम दक्षता समिती ॲक्टिव्ह करण्याचे निर्देश दिले आहे. प्रत्येक गावातील ग्राम दक्षता समित्यांनी प्रशासन व शासनाकडून दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले काम सुरू करावेत, अशा सूचनाही सीईओंनी दिल्या आहेत.

कोट

ग्राम दक्षता समितीचे कामकाज मध्यल्या कालावधीत काही गावांत रखडले होते. परंतु ग्रामीण भागातील कोरोना बांधिताची वाढती संख्या लक्षात घेता ग्राम दक्षता समित्यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार सक्रिय होऊन आपले कर्तव्य बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- अविश्यांत पंडा,

मुख्यकार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद