शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी विभागाचा अफलातून कारभार

By admin | Updated: June 9, 2014 23:21 IST

समाजकल्याण विभागाच्या अधिनस्थ असलेल्या येथील जात पडताळणी विभागाच्या अफलातून कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहे. जात पडताळणीच्या अटी पूर्ण झाल्यानंतरही प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घ्यावे

अमरावती : समाजकल्याण विभागाच्या अधिनस्थ असलेल्या येथील जात पडताळणी विभागाच्या अफलातून कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहे. जात पडताळणीच्या अटी पूर्ण झाल्यानंतरही प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. जात पडताळणी समितीची बैठक झाली नसल्याचे एवढेच टिपिकल उत्तर देत केवळ तारीख पे तारीख असा कारभार सुरू आहे.येथील जात पडताळणी  विभागाचे कामकाज अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या जिल्ह्यांसाठी चालविले जाते. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज दिल्यानंतर निर्धारित वेळेत संबंधित अर्जदाराला प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. मात्र सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतरही जात प्रमाणपत्र दिले जात नाही. या कार्यालयाच्या पायर्‍या झिजवून नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र आहे. मात्र चिरीमिरी देऊन जात प्रमाणपत्र सहजतेने मिळविता येते, असा या विभागाचा कारभार सुरू आहे. दर दिवसाला हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक जात पडताळणी प्रमात्रासाठी या कार्यालयात येतात. या कार्यालयात नागरिकांचे काहीही म्हणणे ऐकून घेतले जात नाही. कळविले जाईल, समितीची बैठक व्हायची आहे, मेसेज पाठवू, अशा ठरावीक भाषेत उत्तर देत जनतेला छळ केला जात आहे. तयार झालेले जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप करण्यास विलंब का लावला जात आहे, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. जात पडताळणीकरिता अर्ज दाखल केल्यानंतर त्याची पोच दिली जाते. मात्र अनेक अर्जदारांकडे पोच असताना फायली गहाळ झाल्याचाही प्रकार येथे घडत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्राप्त अर्जांची छाननी करून ती समितीपुढे सादर केली जाते. ज्या अर्जदारांचे कागदपत्र पूर्ण असल्यास त्यांची छाननी करून अशा अर्जदारांना भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठविला जातो.  अनेक अर्जदारांना संदेश मिळाला. मात्र ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही. प्रमाणपत्र वाटप न करण्यामागील काय गौडबंगाल आहे हे अर्जदारांना कळेनासे झाले आहे. जात पडताळणी विभागाच्या अफलातून कारभाराविषयी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.