शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख मजूर आधार लिंकिंगच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 17, 2015 22:50 IST

रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने मजुरांचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यासाठी मजुरांचे आधार नंबर बँक खात्याशी लिंक केले जात आहे.

अमरावती : रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने मजुरांचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यासाठी मजुरांचे आधार नंबर बँक खात्याशी लिंक केले जात आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या कामाची अद्याप केवळ ४८.५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. आधार नंबरच्या नोंदी घेण्यात आल्या असल्या तरी त्या बँकेकडून व्हेरीफाय न झाल्यामुळे तब्बल १ लाख ११ हजार ५५१ हून अधिक मजूर लिंकिंगच्या प्रताक्षेत ताटकळत आहेत. आतापर्यंत केवळ १ लाख ५० हजार ४८ एवढ्या मजुरांचेच आधार बँक खात्याशी लिंक झाले आहेत. त्यामुळे या मजुरांचे पैसे त्यांच्या खात्यावर थेट जमा होऊ शकतात. रोजगार हमी योजनेतील गैरप्रकार कमी करण्यात येऊन मजुरांना त्याची रोजंदारी वेळेत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मजुरांचे वेतन थेट बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. यासाठी सरकारने आदेश दिल्याप्रमाणे कामकाज केले जात आहे. आधार बेस्ट पेमेंटची कारवाई जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेकडे नोंद असलेल्या २ लाख ९७ हजार ५३ मजुरांचे आधार क्रमांक खात्यांना लिंक केले जाणार आहेत. या मोहिमेत आतापर्यंत एमआयएस सिस्टीमवर १ लाख ५० हजार ४८ मजुरांचे आधार कार्ड 'अपलोड' करण्यात आले आहेत. त्यातील आजमितीस १ लाख ११ हजार ५५१ मजूर कार्यरत आहेत. त्यांचे बँकेमार्फत व्हेरीफिकेशन झालेले नाही. त्यामुळे त्यांचे आधार नंबर बँक खात्याशी लिंक झालेले नाहीत. या मजुरांचे नंबर लिंक झाल्याशिवाय त्यांच्या खात्यावर वेतन जमा करता येणे शक्य होणार नाही. या कामात अमरावती जिल्हा पाहिजे तसा पुढे नसून माघारला जात असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)