शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दर ३५ नागरिकांमागे एक संक्रमित, ६६ रुग्णांमागे एका पॉझिटिव्हचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारी ८०,६५८ वर पोहोचली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख गृहीत धरता दर ३५ नागरिकांमागे ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारी ८०,६५८ वर पोहोचली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख गृहीत धरता दर ३५ नागरिकांमागे एक कोरोनाग्रस्त व दर ६६ पॉझिटिव्हमागे एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे.

जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिला पॉझिटिव्ह व संक्रमिताच्या मृत्यूची पहिली नोंद झाल्यानंतर सातत्याने कोरोना संसर्ग वाढताच राहिला आहे. यानंतर सप्टेंबर महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली. यामध्ये ७,७१३ पॉझिटिव्ह व १५४ मत्यूची नोंद झाली. त्यानंतर मात्र, फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ मृत्यू. मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व तब्बल ४१० रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय मे महिन्यातील १४ दिवसांत तब्बल १३,९६१ पॉझिटिव्ह व २४७ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट साडेचार महिन्यांनंतरही कमी होताना दिसत नसल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी नव्हे, तर तिसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. या काळात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीदेखील २२ ते ३० दरम्यान राहिली आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट महापालिका क्षेत्रात, तर तिसरी लाट ही जिल्हा ग्रामीणमध्ये सुरू झाल्याची खुद्द आरोग्य विभागातच चर्चा आहे.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने जिल्हा व आरोग्य प्रशासनाने आता तालुकास्तरावर व मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही किमान २५ ते ३० ऑक्सिजन बेडचे नियोजन केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

दुसऱ्या लाटेत ९१३ संक्रमितांचा मृत्यू

कोरोनाच्या पहिल्या लाटेत १५४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मात्र, फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत तब्बल ९१३ संक्रमितांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. दर महिन्याला संक्रमितांच्या मृत्यूचा आकडा वाढताच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,२१३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत दर ६६ रुग्णांमागे एकाचा मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

फेब्रुवारीपासून ५७,४०३ पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत म्हणजेच फेब्रुवारी ते १४ मे या कालावधीत ५७,४०३ कोरोनाग्रस्त व या कालावधीत ९१३ संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण या कालावधीत आहे. ऑक्सिजन बेडचा तुटवडा, रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची भटकंती. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीतही ओट्यासाठी प्रतीक्षेत राहण्याची वेळ या काळात आलेली आहे.

बॉक्स

सक्रिय रुग्ण उच्चांकी १०,८९२

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या कालावधित सक्रिय रुग्णांची संख्या पहिल्यांदा उच्चांकी १०,८४२ वर पोहोचली आहे. यात २,३१२ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. याशिवाय ग्रामीणमध्ये उच्चांकी ७,८४७ व महापालिका क्षेत्रात ३.०४५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णसंख्या वाढती असल्याने रिकव्हरीचे प्रमाण ८४.९९ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे.