शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

२१६३ हेक्टर क्षेत्रांवर ओलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:24 IST

तालुक्यातील कोरडवाहू २ हजार १६३ हेक्टर जमिनीसाठी वरदान ठरणाऱ्या पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आल्याचे लेखी पत्र विदर्भ विकास मंडळ (नागपूर) यांच्यावतीने जलसंपदा विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंत्यांना देण्यात आले.

ठळक मुद्दे१० वर्षांपासून पाठपुरावा : पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : तालुक्यातील कोरडवाहू २ हजार १६३ हेक्टर जमिनीसाठी वरदान ठरणाऱ्या पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आल्याचे लेखी पत्र विदर्भ विकास मंडळ (नागपूर) यांच्यावतीने जलसंपदा विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. माजी आमदार अरुण अडसड यांनी २००८-०९ पासून शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. ३ जानेवारी रोजी सदर पत्र प्राप्त झाले आहे.चांदूररेल्वे तालुक्यातील जळका जगताप, आमला विश्वेश्वर, टेंभुर्णी, सावंगी (मग्रापूर), पाथरगाव व सालोरा (खुर्द) ही गावे कोरडवाहू क्षेत्रात समाविष्ट आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपासून २ हजार १६३ हेक्टरचे क्षेत्रातील शेती करोडवाहू क्षेत्र म्हणून तालुक्यात ओळखले जाते आहे. आमला विश्वेश्वर येथील ज्ञानेश्वर मालखेडे, भगवान वाघ, टेंभुर्णीचे रावसाहेब शेळके, जळका (जगताप) निंभा माने, डॉ. पाचडे, डॉ. राजेश पखाले, ज्ञानेश्वर खेरडे यांनी माजी आमदार अरुण अडसड यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्या भेटीचा धडाका लावून आठ वर्षांनी या पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळवून दिली. विदर्भ पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे, अमरावतीचे लांडेकर, अधीक्षक अभियंता ढवळे, वर्धा अपरचे पोटफोडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपसा सिंचन योजनेला मान्यतेसाठी प्रस्ताव वरिष्ठांंकडे दाखल केले होते. गेल्या ७० वर्षांपासून या भागातील शेतकरी कोरडवाहू शेती करीत आहे. पाथरगाव उपसा सिंचन योजना लवकरात लवकर कार्यान्वित झाली, तर या भागातील शेतकरी ‘सुजलाम् सुफलाम्’ झाल्याशिवाय राहणार नाही. परिणामी शेतकºयांना सुगीचे दिवस येईल.