शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी रस्त्यावर

By admin | Updated: April 10, 2015 00:31 IST

महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध गुरूवारी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

अमरावती : महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध गुरूवारी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यवतमाळ जिल्ह्यातील घांटजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उत्तम मानकर यांच्यावर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीरी मंजूर करण्यासाठी दबाव टाकून मारहाणीचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत गटविकास अधिकारी प्रकाश वाघ यांच्याकडे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रभार आहे. मात्र, या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील घाटपुरी येथील अंगणवाडी केंद्रात दोन वर्षांपूर्वीच्या पोषण आहारात अनियमितता होती. सदर प्रकरण विधान परिषदेत तारांकित प्रश्नात लावून धरले असता. प्रकाश वाघ यांच्या निलंबनाचे आश्र्वासन सभागृहात देण्यात आले. या प्रकरणात वाघ यांचा कसलाही दोष नसताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.त्यामुळे ही कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.या आंदोलनात विभागीय अध्यक्ष सुनील निकम, सचिव विनोद खेडकर, के.एम अहमद, अरूण मोहोड, पंकज इंगळे, प्रिती देशमुख, प्रमोद कापडे, संजय जोल्हे, किशोर काळे, अरविंद गुळदे, नरेंद्र धारगे, एस .बी. गुहे, रामकृष्ण पवार, बी.एस. रेंगळे, आर के.जोशी, सूरज गोहाड, प्रकाश तट्टे, बाळासाहेब रायबोले, तुकाराम टेकाडे, एस.पी.थोरात, दिलीप मानकर, सतीश खानंदे, पी.आर.राठोड, भालचंद्र बहिरम, बी.डब्ल्यू. चव्हाण, पी. आर.वाघ, डी.ए. पतंगराव, जे.पी बाबरे, बी.डब्ल्यू. कनाटे, सुधाकर दंवडे, एस.व्ही.देशमुख, मनोहर खिल्लारी, एस. एच.पराते यांच्यासह विभागातील सर्व पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, प्रवीण ठाकरे यांनी आंदोलनाला समर्थन दिले. (प्रतिनिधी)