शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

संत्रा उत्पादकांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्या

By admin | Updated: October 31, 2015 01:07 IST

डबघाईस आलेल्या संत्रा उत्पादकांना शासनाने सरसकट २५ हजार रूपये मदत जाहीर करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली ....

निवेदन : शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनपरतवाडा : डबघाईस आलेल्या संत्रा उत्पादकांना शासनाने सरसकट २५ हजार रूपये मदत जाहीर करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली असून त्यांनी आज गुरूवारी दुपारी ३ वाजता अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के यांना एक निवेदन दिले.यावर्षी संत्रा उत्पादकांची अवस्था अत्यंत बिकट आहे. मालाला उठावच नसल्यामुळे संत्रा तोडणीची प्रक्रिया मंदावली आहे. संत्र्यावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट व आवाकी काळाचे नियोजन आखले जाते. मात्र यावर्षी भरपूर माल असल्याने बाजारपेठामध्ये मातीमोल भावात विक्री होत आहे. ७ ते ८ रुपये किलो चांगला संत्र्याला भाव मिळत आहे. २० रूपये भाव अपेक्षित होता. किलोमागे १२ ते १५ रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट पूर्णपणे कोसळले आहे. इतकेच नव्हे तर वातावरणाचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसला आहे. उष्ण वातावरणामुळे ५० ते ६० टक्के संत्राफळे गळली आहे. भाव कमी व गळतीमुळे एकट्या अचलपूर तालुक्यात ३०० कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र गोरले यांच्या नेतृत्वात संत्रा उत्पादक कृती समितीचे सुभाष उभाड, कृऊबास संचालक दीपक पाटील टवलारकर, पं. स. उपसभापती गजानन भोरे, कृउबास उपसभापती कुलदीप काळपांडे, राहुल कडू, मधुकर नाकट, कैलास आवारे, साहेबराव काठोळे, अवधुतराव हरणे, नितीन आगे, रणजित लहाने, तुळशीदास राहाटे, प्रशांत देशमुख, कृउबास संचालक बाबूराव पाटील गावंडे, रवी पाटील सालेपूरकर, संजय चोबीतकर, भाष्कर मेहरे, खविस उपाध्यक्ष विजय बेलसरे, खविस संचालक अशोक ठाकरे, विष्णुकांत भुसारी, संजय चरोडे, कृउबास संचालक पोपट घोडेराव, अजय पाटील उभाड, अविनाश देशमुख, दिनेश ठाकरे, नरेंद्र पाटील पवित्रकार, गोविंद गाडगे, सुभाष लहाने, पुरुषोत्तम लकडे, विश्वनाथ रामेकर, नीलेश वऱ्हेकर, पुष्पेंद्र राहाटे, विकास पिसाळ, पं. स. सदस्य ओमश्री घोरे, रवींद्र मुळे, शिवाजी कडू, दीपक लक्ष्मीनारायण अग्रवाल, अ‍ॅड. अभिजित तनपूरे, अ‍ॅड. जितेंद्र गौड, अ‍ॅड. यावले, हरिश्चंद्र खुजे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)