शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शहर ‘ओडीएफ’ची स्वप्नपूर्ती!

By admin | Updated: July 2, 2017 00:10 IST

१७ हजारांपेक्षा अधिक वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयाची उभारणी,

महापालिकेचे सकारात्मक प्रयत्न : क्युसीआयच्या तपासणीनंतर अंतिम शिक्कामोर्तब लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १७ हजारांपेक्षा अधिक वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयाची उभारणी, निर्मुलन केलेली ‘ओडीस्पॉट’, गुडमॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकाची स्थापना या विविध आघाड्यांवरील कार्याने शहराने ‘हागणदारीमुक्त’चा प्रवास यशस्वी केला आहे. राज्यस्तरीय समितीच्या सर्वंकष तपासणीत शहर पात्र ठरल्याचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शुक्रवारी महापालिकेला कळविले आहे.. हागणदारीमुक्त शहरावर क्युसीआयच्या तपासणीनंतर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.२ ते ४ मे दरम्यान सुधीर शंभरकर यांच्या नेतृत्वातील पथकाने शहरातील विविध भागांची पाहणी केली. पाहणीनंतर या राज्यस्तरीय पथकाने महापालिकेने केलेल्या हागणदारीमुक्तीचा दावा खोडून काढला व अंतिमत: पाच त्रुट्या काढल्या. त्या त्रुट्या उपसचिव सुधाकर बोबडे यांनी आयुक्तांना कळविल्या. त्यानुसार आयुक्त आणि त्यांच्या अधिनिस्थ यंत्रणेने त्या त्रुट्यांचा अभ्यास करून कामाला सुरूवात केली. उघड्यावर शौचाचे जागा आढळून आल्याचे निरिक्षण शंभरकर यांनी नोंदविले होते. अहवालानंतर त्या १४ ओडीस्पॉटचे निर्मूलन करण्यात आले.राज्य समितीच्या भेटीनंतर ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही अशा ५१८ कुटुंबाना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गंत आतापर्यंत १२२५४ वैयक्तिक शौचालये तर अन्य योजनांमधून ५८३२ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली.बऱ्याच प्रमाणात व्यक्ती उघड्यावर शौचास जाताना आढळून आल्याचे निरिक्षण तपासणीत नोंदविण्यात आले होते. त्यानंतर ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता जागा उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना १३४ ठिकाणी सामुदायिक शौचालये बांधून देण्यात आली.उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांकडून १६,२०० दंड तसेच फौजदारी कारवाई करण्यात आली. बोंर्डेंनी केली फेरतपासणीशंभरकर यांच्या नेतृत्वातील राज्यस्तरिय समितीने पाच त्रुट्या काढल्यानंतर त्या त्रुट्या दूर सारून नव्याने उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर आयुक्तांनी नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार करून फेरतपासणीसाठी पुन्हा राज्यस्तरीय समिती पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या नेतृत्वातील राज्यस्तरीय तपासणी समितीने १० व ११ जूनला शहराची तपासणी केली. त्रुट्या दूर करण्यास प्राधान्य सुधीर शंभरकर यांच्या नेतृत्वातील तपासणी पथकाने काढलेल्या त्रुट्या प्राधान्याने दूर करण्यासाठी आयुक्तांनी पाठपुरावा केला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्या नेतृत्वात आरोग्य व स्वच्छता यंत्रणेने शौचालय उभारणीसह ओडीस्पॉटवरील जनजागृतीवर अधिक भर दिला. त्यामुळेच शहर हागणदारीमुक्त होवू शकले, अशी हर्षभरित प्रतिक्रिया आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. राज्यस्तरीय तपासणी समितीच्या अहवालानुसार अमरावती ‘हागणदारीमुक्त शहर’ म्हणून तपासणीत पात्र ठरले आहे. क्युसीआयच्या तपासणीनंतर शहर ओडीएफवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. - हेमंत पवारआयुक्त, मनपा