शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांना बदल्यांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

अमरावती : सन २०२० व २०२१ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या वार्षिक बदल्या झालेल्या नाहीत. गैरसोय येत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आता ...

अमरावती : सन २०२० व २०२१ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या वार्षिक बदल्या झालेल्या नाहीत. गैरसोय येत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आता कोरोनाची लाट ओसरत आल्यामुळे बदल्यांचे वेध लागले आहेत.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने पारित केलेल्या सुधारित निर्णयाची दुर्गम शाळांच्या निकषानुसार अतिपर्जन्यमान, वाहतुकीच्या सुविधेचा अभाव, संवाद छायेचा प्रदेश, जंगली श्वानांचा हल्ला आदी समावेश करण्यात आला आहे. सुगम शाळेत सलग १० वर्षे एकाच शाळेत व सलग पाच वर्षे सेवा झालेले शिक्षकच प्रशासकीय बदलीसाठी पात्र धरण्यात आले आहेत. ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविताना एकाच वेळी सर्व संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या न करता संवर्गनिहाय टप्प्याटप्प्याने बदल्या होणार आहेत. एका टप्प्यातील बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यासाठी शाळांचे पसंतिक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी असणाऱ्या शाळांच्या २० पसंतिक्रमाऐवजी शिक्षकांना ३० शाळा पर्याय भरता येणार आहेत. स्वतःहून दुर्गम शाळा मागणाऱ्याला शिक्षकांची तीन वर्षांनी प्राधान्याने सुगम भागात बदली होणार आहे. सुगम भागात बदली मागणाऱ्या शिक्षकाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विनंती बदली मागता येणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर होणार आहे. संवर्ग १ मध्ये समावेश होणाऱ्या व्याधिग्रस्त शिक्षक व त्यांचे जोडीदार घटस्फोटित महिला, विधवा, कुमारिका, आजी-माजी सैनिक व त्यांच्या पत्नी, ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक यांना संवर्ग १ मधून लाभ घेतल्यानंतर तीन वर्ष बदलीसाठी प्रतिबंधित केले आहे. संवर्ग १ मध्ये समावेश असणाऱ्या कर्मचारी पती-पत्नीमध्ये दोघांपैकी कोणालाही बदली मागण्याचा अधिकार देण्यात आला आहे. संवर्ग ३ मध्ये समावेश असणाऱ्या दुर्गम शाळेतील शिक्षकांना सलग तीन वर्षे सेवा केल्यानंतर प्राधान्याने बदलीचा अधिकार देण्यात आला आहे. संवर्ग-४ मधील व कार्यरत असणाऱ्या शिक्षक पती-पत्नीला एक युनिट माणून बदली करण्यात येणार आहे. बदलीबाबत शासनाने धोरण ठरविले असले तरी अद्याप प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत शासन स्तरावरून सूचना आलेल्या नाहीत. अशातच शिक्षक संवर्ग वगळता अन्य झेडपी कर्मचाऱ्यांच्या पुढील आठवड्यात बदल्यांचा बिगूल वाजणार असल्याने आता शिक्षकांना बदलीचे वेध लागले आहेत.