शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजारांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्ह्यात सोमवारी २८७ अहवाल पॉझिटिव्ह आले व तीन रुग्णांचा मृत्यूही झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजार ...

अमरावती : जिल्ह्यात सोमवारी २८७ अहवाल पॉझिटिव्ह आले व तीन रुग्णांचा मृत्यूही झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजार २६८ झाली आहे. महापालिका क्षेत्रात २६ हजारांवर रुग्णांची नोंद ही चिंताजनक बाब आहे.

जिल्ह्यात चाचण्यांची संख्या कमी झाल्याने दोन दिवसांत संक्रमितही घटले. मंगळवारी १,२७४ नमुन्यांच्या चाचणीतून २८२ अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, पाॅझिटिव्हिटी कमी झालेली नाही. २२.१३ टक्के अशी पॉझिटिव्हिटी मंगळवारी नोंदविली गेली. विद्यापीठ लॅबची क्षमतावाढ करण्यात आल्याने आता १६०० चाचण्यांची तपासणी होईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले असले तरी रविवारी सुटीचा दिवस असल्याने काही चाचणी नमुने केंद्रे बंद होती.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर बाजारात पुन्हा गर्दी वाढली आहे. तथापि, पॉझिटिव्हिटी २३ टक्क्यांपर्यंत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नसल्याचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर आता २० पथकांद्वारे दंडात्मक कारवायांची मोहीम जिल्हा प्रशासन राबवित आहे. त्यातही पथकप्रमुख दांडी मारून सहायकांना पाठवत असल्याचे दिसून आले.

बॉक्स

मंगळवारी तीन मृत्यू, ८५३ डिस्चार्ज

* जिल्ह्यात २४ तासांत अमरावती शहरात राठीनगरातील ७३ वर्षीय महिला, करुणनगरातील ७३ वर्षीय पुरुष व अचलपूर तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ५७२ वर पोहोचली आहे.

* मंगळवारी ८५३ रुग्ण संक्रमणमुक्त झाले. सद्यस्थितीत संक्रमनमुक्त रुग्णांची संख्या ३३,८२१ झाली आहे. सध्या रुग्णसंख्या वाढल्याने रिकव्हरी रेट घटून ८३.९९ टक्क्यांवर आला आहे.

बॉक्स

बाहेर पडलेल्या रुग्णांना ७५ हजारांचा दंड

महापालिका आयुक्तांचे निर्देशानुसार होम आयसोलेशनमधील रुग्णांची तपासणी डॉ. सचिन बोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असता, तीन रुग्ण घरी आढळले नाहीत. या रुग्णांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड करण्यात आला. हमालपुरा भागात ही कारवाई करण्यात आली. यापुढे एफआयआर नोंदविण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत