अमरावती : प्राचीनकाळी स्थापन करण्यात आलेल्या एकवीरा देवीच्या मूर्तीवरील शेंदुराची खोळ निघाल्याने मूळ चतुर्भूज पाषाण मूर्तीचे दर्शन बुधवारी होऊ शकले. शेंदुराची खोळ निघणे, ही नैसर्गिक प्रक्रिया असून चमत्कार नाही. मात्र आता एकवीरेच्या मूळ मूर्तीवर शेंदुराची खोळ चढविणाली जाणार नाही, असा निर्णय मंदिर विश्वस्तांनी घेतल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष रमेशपंत गोडबोले यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.एकवीरा देवीच्या मंदिराचा जीर्णोव्दार सरूआहे. यादरम्यान शेकडो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या एकवीरेच्या मूळ मूर्तीचे दर्शन होणे, ही बाब समस्त भक्तांसाठी आनंदाची आहे. अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या मुखवट्याचे दर्शन करण्याची परंपरा आहे. अचानक मूळ मूर्तीचे दर्शन घडू शकल्यामुळे ही घटना आनंदोत्सव सोहळ्याच्या रूपाने साजरा करण्याचे मंदिर व्यवस्थापनाने ठरविले आहे. गुरुवारपासून सलग पाच दिवस मंदिरात दीपोत्सव साजरा होणार असून संपूर्ण परिसर प्रकाशमय केला जाईल, असे गोडबोले यांनी सांगितले. सुमारे ७०० वर्षे प्राचीन मूर्तीवरील शेंदुराची खोळ निघाल्याच्या घटनेचे वैज्ञानिक विश्लेषण करताना विश्वस्त मंडळ म्हणाले, शेंदुरात रसायनांचे मिश्रण असल्याने कालांतराने रासायनिक प्रक्रिया होतो. त्याचा परिणाम म्हणून ही शेंदुराची खोळ निघते. खोळ निघणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून कोणताही चमत्कार नसल्याचे विश्वस्तांनी ठासून सांगितले.
आता एकवीरेच्या मूळ मूर्तीचे होणार भविकांना दर्शन !
By admin | Updated: August 28, 2014 23:28 IST