शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी थंडी झाली आता बोचरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:42 IST

शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली असून, गजबजलेले अमरावती शहर सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. पारा गेल्या तीन दिवसांपासून १० अंशाच्या खाली स्थिरावला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शीतलहर : शनिवारी पारा ५.४ अंशावर, २० वर्षांतील तापमानाचा नीचांक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली असून, गजबजलेले अमरावती शहर सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. पारा गेल्या तीन दिवसांपासून १० अंशाच्या खाली स्थिरावला आहे.गजा या वादळाच्या प्रभावाने पंधरवड्यापूर्वी तापमानात वाढ झाली होती. त्यामुळ पावसाळ्यासारखीच थंडीही अचानक गायब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, या वादळाचा प्रभाव ओसरताच थंडीने पुन्हा जोर धरला. तीन दिवसांपासून तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे. त्यामुळे ती असह्य झाली आहे. शुक्रवारी पहाटे किमान तापमान ५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हा गेल्या २० वर्षांतील तापमानाचा नीचांक असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी स्पष्ट केले.नंदनवनातही पारा घसरलाचिखलदरा पर्यटन स्थळावरील पारा शनिवारी पहाटे ७ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. १५ दिवसांत दुसºयांदा एवढी कमी नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. किमान ७ व कमाल १६ अंश सेल्सिअसपर्यंत चिखलदरा पर्यटन स्थळाचे तापमान खाली आले आहे. बोचरी थंडीपासून संरक्षणार्थ आदिवासी अंगात गरम कपडे आणि शेकोटीवर चुलीचा आसरा घेत आहेत.५ जानेवारीपर्यंत थंडी कायमसंपूर्ण विदर्भात थंडीची लाट पुढील ५ जानेवारीपर्यंत कायम राहील. तथापि, त्याची तीव्रता कमी-जास्त होईल, असा अंदाज अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहत असल्याने मध्य महाराष्ट्रात मात्र थोडा दिलासा मिळणार आहे.अमरावती गारठलीअमरावती शहरातील रस्त्यांवर उशिरा रात्रीपर्यंत वर्दळ असते. तथापि, तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाताच तीन दिवसांपासून वर्दळ रोडावल्याची स्थिती आहे. एरवीही शांत राहणाºया कॉलनी परिसरात ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ असतो.