शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आता पालकही घेणार पोषण आहाराची चव

By admin | Updated: December 2, 2015 00:20 IST

शालेय पोषण आहाराबाबत तक्रारींचा ओघ वाढत आहे. यासंबंधित गावखेड्यातील पालकच पोषण आहाराचा दर्जा ठरविणार आहेत.

दर्जा सुधारणार : अंमलबजावणीस सुरुवातअमरावती : शालेय पोषण आहाराबाबत तक्रारींचा ओघ वाढत आहे. यासंबंधित गावखेड्यातील पालकच पोषण आहाराचा दर्जा ठरविणार आहेत. या उपक्रमाची मंगळवार १ डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शाळांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणीसुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा पाहण्यासाठी आता पालकांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक शाळेत दररोज एक पालक मुलासोबत पोषण आहार घेतील. मोबाईलवरून एसएमएसद्वारे संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्याला आहाराचा दर्जा सांगतील. ज्या शाळांतील आहाराबाबत पालकांच्या तक्रारी आल्यात त्या पुरवठादाराला मालाचे पैसे देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.प्रत्येक शाळेतील पालकांचे दररोज आलेले एसएमएस एकत्रित करुन त्या शाळात पुरवठा होणाऱ्या आहारासंदर्भात अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे.शाळांमधून दिल्या जाणाऱ्या आहारांमध्ये सातत्य नसल्याची ओरड आणि त्याचबरोबर तांदूळ आणि अन्य कडधान्य निकृष्ठ दर्जाचे असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमिवर शिक्षण विभागाने ही अनियमितता रोखण्यासाठी पालकांची मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)