शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आता कन्हान रेतीही 'डुप्लिकेट'

By admin | Updated: June 24, 2016 23:54 IST

कारखान्यातील वेस्ट आणि विटांचा चुरा नाल्यातील रेतीत मिसळून बनावट कन्हान रेती तयार करण्याचा धक्कादायक व्यवसाय मागील काही वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे.

बडनेऱ्यात गोरखधंदा : रात्री उत्पादन, दिवसा विक्री श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराकारखान्यातील वेस्ट आणि विटांचा चुरा नाल्यातील रेतीत मिसळून बनावट कन्हान रेती तयार करण्याचा धक्कादायक व्यवसाय मागील काही वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे. रात्री यंत्राद्वारे डुप्लिकेट कन्हान रेती तयार करून दिवसा राजरोसपणे चढ्या भावात या रेतीची विक्री केली जाते. महसूल यंत्रणेच्या संगनमताशिवाय असा प्रकार होणे शक्यच नाही. मात्र या प्रकारामुळे सामान्य ग्राहक कन्हान रेती समजून ही भेसळयुक्त रेती खरेदी करतो. गंडविला जातो. त्या रेतीपासून बांधलेले घरही धोकादायक ठरू शकते. अकोला महामार्गालगत येथील सेंट्रल नाक्यासमोर शासकीय भूखंड आहे. या भूखंडावर राजरोसपणे बनावट कन्हान रेती तयार केली जाते. १० कि.मी. परिघातील पाचेक नााल्यांमधून निकृष्ट रेती आणली जाते. वीटभट्ट्यांवरील विटांचे तुकडे तसेच एमआयडीसीतल कारखान्यात बॉयलरमध्ये वापरुन झाल्यानंतर अतिउष्णतेच्या प्रक्रियेतून तयार झालेले- जणू काळे दगड भासावे, असे टाकाऊ पदार्थ भेसळीसाठी वापरले जातात. विटांचे तुकडे आणि वेस्ट मटेरियलाची यंत्राद्वारे भुकटी केली जाते. नाल्याच्या रेतीत ती मिसळली जाते. रेतीला अगदी कन्हान रेतीचा रंग प्राप्त होतो. शहरातील दलालांमार्फत कन्हानची ही रेती त्यातल्या त्यात कमी भावात विकण्याचा राजरोस धंदा येथे सुरु आहे. ज्या शासकीय जागेवर हा गोरखधंदा सुरू आहे, तेथे केवळ चौकीदाराच असतात. रात्री यंत्राद्वारे रेती तयार केली जाते. बडनेरा शहरवासीयांना या ठिकाणी चालणाऱ्या या गोरखधंद्याची माहिती असल्याने बडनेरावासी या रेतीचा फारसा वापर करीत नाहीत. दलाल अमरावती शहरात ही बनावट रेती विकत आहेत. महसूल यंत्रणेची डोळेझाक महामार्गालगत बडनेरा येथे मागील ३ ते ४ वर्षांपासून शासकीय भूखंडावर बनावट कन्हान रेती तयार करुन तेथेच विक्री करण्याचा धंदा सुरु आहे. याची थोडीही भनक महसूल विभागाला असू नये, याचे आश्चर्य वाटते. किबहुंना त्यांच्या संगनमताने हा धंदा फोफावला असल्याचा आरोप होतो. विशेष म्हणजे मागच्या आठवड्यात बडनेऱ्यात रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापैकी एक कारवाई याच स्पॉटवर परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम व नायब तहसीलदार मांजरे यांनी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे ढीग साठवून ठेवले असताना डोळेझाक करण्यात आलेली आहे. अशी तयार होते ‘कन्हान रेती’ विटांचे तुकडे, एमआयडीसीतील टाकाऊ दगड व नाल्यातील रेती एकत्र करून यंत्राद्वारे त्याचा चुरा केला जातो आणि बनावट कन्हानची रेती तयार केली जाते. ही रेती रात्रीच्या वेळी तयार केली जाते. ५० ते १०० फूट या परिमाणात लहान आकारांच्या वाहनांमधून विकली जाते एमआयडीसीतील नामांकित कंपनीतील टाकावू दगड या गोरखधंदासाठी वापरले जातात. मालक पडद्याआड: चौकीदार पाहतो कारभार शासकीय भूखंडावर सुरू असलेल्या या साहित्याची देखरेख व विक्रीची आॅर्डर रखवालदर घेतो. मालक कधीच समोर येत नाही. शहरातील दलालाद्वारे रेतीची आॅर्डर नोंदविल्यानंतर रखवालदाराच्या देखरेखीत रेतीची उचल करण्यात येते. हा सर्व व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होतो. जिल्ह्यात अवैध रेतीचा आगडोंबअवैध वाळू वाहतूदारांवर मोक्का लावण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर वाळू तस्करांमध्ये खळबळ माजली आहे. मात्र बडनेरालगत बनावट वाळू विक्रीचा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू आहे.