शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्रा़पं़़ निवडणुकीची व्यूहरचना संगणकावर

By admin | Updated: March 29, 2015 00:27 IST

सध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

मोहन राऊ त अमरावतीसध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी निवडणुकीला ३० दिवस शिल्लक असताना आपल्या गटाचा विजय व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी थेट संगणकावर व्यूहरचना आखली जात आहे. त्यानुषंगाने गावातील युवकांना ग्रामविकासाचा ‘मेसेज’ द्यायला सुरूवात झाली आहे़जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा तर काही तालुक्यांतील पंचायत समिती निवडणूक मागील वर्षी पार पडली. आता सहकार क्षेत्रातील निवडणुका सुरू असताना जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे़ याचा सर्वाधिक फायदा संगणकीय प्रणालीत विविध कंपन्यांनी व गावातील गटांनी घेणे सुरू केले आहे़ मोठ्या ग्रामपंचायतींच्या रहिवाशांचा मोबाईलवर अनेक मेसेज देणे सुरू केले आहे़ हा मेसेज पूर्णपणे मराठीत असल्यामुळे आपल्या गावाच्या विकासात मेसेज पाठविणाऱ्या गटाचा मोठा सहभाग असल्याचा भास आता या मतदारांना होऊ लागला आहे़ गावातील मतदारांच्या यादीप्रमाणे डाटा भरून घेतला जात आहे़ मतदाराची जात, व्यवसाय नोकरी पत्ता विशेष म्हणजे भ्रमण, दूरध्वनी क्रमांकांची नोंद या डाटात केली आहे़ याशिवाय आडनाव, घर, क्रमांक संपर्क व्यक्ती वयोमानानुसार पुरूष, स्त्री मतदारांची संख्या यात समाविष्ट आहे़ आजपर्यंत एका वॉर्डातील कुटुंबाला दुसऱ्या राजकीय गटाने किती शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला याविषयी माहिती 'अपडेट' करण्यात आली आहे़ ग्रामीण भागातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गट एकामेकासमोर उभे राहणार असले तरी आपल्या गटात किती मतदारांचा अधिक समावेश व्हावा यासाठी बेरजेचे राजकारण आतापासून खेळले जात आहे़ विशेषता: ही हायटेक प्रणाली ग्रामीण मतदारांच्या मानसिकतेमध्ये रूजली जाऊ शकते़ हा संशोधनाचा विषय असला तरी आपल्या गावाच्या विकासाचा अथवा संबंधित सरपंच व उपसरपंच यांनी पाच वर्षांत कोणतेच काम केले नाही. याचा थेट मोबाईलवर व्हाईस मेसेज तसेच लिखित संदेश मिळत असल्यामुळे या ग्रामीण भागाचे राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापायला सुरूवात झाली आहे़ व्हाईस मेसेजद्वारे ग्रामस्थांना थेट गावाचा विकास किती झाला अथवा संबंधित लोकप्रतीनिधींनी विकास केला किंवा नाही याचा मेसेज पोहोचत असल्यामुळे मतदार पुढील काळात जागृत होणार आहे़ युवकांमध्ये होणारी ही संगणकीय जागृती लोकशाहीसाठी न्यायिक असल्याचे मत अंजनसिंगीच्या कार्यकर्त्या पपिता मनोहरे यांनी व्यक्त केले़