शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

आता अंगणवाड्यांवर महापालिका आयुक्तांचे नियंत्रण

By admin | Updated: June 8, 2014 23:32 IST

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यांवर आता महापालिका आयुक्तांचे नियंत्रण राहणार आहे. दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन बालकांचे आरोग्यविषयक अहवाल आणि कुपोषणाची वस्तुस्थिती

गणेश वासनिक - अमरावतीएकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यांवर आता महापालिका आयुक्तांचे नियंत्रण राहणार आहे. दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन बालकांचे आरोग्यविषयक अहवाल आणि कुपोषणाची वस्तुस्थिती आयुक्तांना शासनाला कळवावी लागणार आहे.  योजनांची नागरी भागात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी सनियंत्रण समिती गठित करण्याचा निर्णय महिला व बाल कल्याण विभागाने घेतला आहे.राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाचे कक्ष अधिकारी दि. बा. पाटील यांच्या स्वाक्षरीने हे शासन आदेश २४ फेब्रुवारी २0१४ रोजी निर्गमित करण्यात आले. बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, उल्हासनगर, कल्याण- डोंबवली, नांदेड- वाघाडा, भिवंडी- निजामपूर, अकोला, मालेगाव, मिरा- भाईंदर, जळगाव, धुळे, अहमदनगर, वसई- विरार, परभणी, चंद्रपूर व लातूर या महापालिका आयुक्तांकडे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नागरी प्रकल्पांची सनियंत्रण आणि आढावा समिती सदस्यांची बैठक घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सात सदस्यीय समितीचे गठन केले जाईल. समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त तर सदस्य म्हणून शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राचार्य मध्यमस्तर प्रशिक्षण केंद्र, प्राचार्य अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बाल कल्याण अधिकारी यांचा समावेश राहील. दर तीन महिन्यानी समितीची बैठक घेऊन अंगणवाड्यांच्या कामकाजांचा  अहवाल आयुक्तांना  शासनाकडे पाठवावा लागेल. लवकरच गठन करण्याचे संकेत  प्रशासनाने दिले आहे