शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आता एसटीतही सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: June 9, 2014 23:19 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत शासन विचाराधीन आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे.

प्रस्ताव विचाराधीन : प्रवासी, कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनागणेश वासनिक - अमरावतीमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत शासन विचाराधीन आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. गत आठवड्यात कल्याण येथे महिला वाहकांसोबत झालेली मारहाणीची घटना राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजली.  यावरून विरोधकांनी सत्ताधार्‍यांची चांगलीच कोंडी केली. अखेर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी बसेसमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी शासन विचार करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये लवकरच कॅमेरे लावले जाण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून नावारुपास आलेल्या एसटीने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. कधी  नफ्यात तर कधी तोट्यात, तरीही एसटीचा प्रवास अविरतपणे सुरू आहे. एसटी डबघाईस येण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचल्यानंतरही  प्रवाशांनी दाखविलेल्या विश्‍वासावरच ती गावखेडे, दर्‍या-खोर्‍यांत पोहोचल्याचे चित्र आहे. मात्र, अलिकडे एस.टी.मध्ये सातत्याने घडणार्‍या दुर्दैवी घटनांमुळे राज्य परिवहन महामंडळावर नामुष्की ओढवली आहे. महिला वाहक आणि कर्मचार्‍यांसोबत प्रवाशांचे वाद, त्यातून निर्माण होणार्‍या अप्रिय घटनांमुळे कर्मचारी हतबल झाले आहेत. खिसेकापुंचा सुळसुळाट, चेन स्नॅचिंग, बॅगा लंपास करणे आदी घटनांपुढे आता महामंडळानेही हात टेकले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी बसस्थानकावर पोलीस चौकी असते. मात्र, धावत्या बसमध्ये अप्रिय घटना घडल्यास   उपाययोजनेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाऊ शकतो.