शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता २०२२ मध्ये होणार देशभरातील व्याघ्र प्रगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST

चार टप्पे निश्चित, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय अमरावती : दर चार वर्षानी वाघांची प्रगणना केली जाते. आता पुढील ...

चार टप्पे निश्चित, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

अमरावती : दर चार वर्षानी वाघांची प्रगणना केली जाते. आता पुढील वर्षी सन २०२२ मध्ये देशभरात व्याघ्र प्रगणना होणार असून, त्याकरिता चार टप्पे निश्चित करण्यात आले आहे. प्रगणनेचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. जून २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यान प्रगणना करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय व्याघ्र गणना ही सन २०२२ साठी होऊ घातली आहे. त्याकरिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पूर्ण करावयाची आहे. एनटीसीएने या प्रगणनेसाठी १० ते २० किमीचे अंतर घटक मानले आहे. यात मांसभक्षी प्राण्यांच्या खाणाखुणांचे सर्वेक्षण, तृणभक्षी प्राणी, वनस्पती व मानवी हस्तक्षेप, जमिनीवरील आच्छादन आणि तृणभक्षी प्राण्यांच्या लेंड्यांचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून उपग्रहाद्वारे प्रत्येक लँडस्केपच्या वैशिष्ट्याबाबतची माहिती गोळा करून पृथ:करण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे सर्वेक्षण टप्प्यांची आखणी केली जाईल. त्यानंतर कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने वाघांची घनता काढण्यात येईल. सॉफ्टवेअरच्या मदतीने तृणभक्षी प्राण्यांची घनता मोजण्याच्या सूचना वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सन २०१८ च्या व्याघ्र प्रगणनेनुसार देशात पट्टेदार वाघांची संख्या २३५० असल्याची नोंद करण्यात आली. आता सन २०२२ मध्ये होणाऱ्या व्याघ्र प्रगणनेनुसार वाघांच्या संख्येत किती वाढ होते, याकडे लक्ष लागले आहे.

--------------

ट्रॅप कॅमेऱ्याची महत्त्वाची भूमिका

कॅमेरा ट्रॅपिंगसाठी संरक्षित क्षेत्राचे आकारमान ४०० चौरस किमी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ब्लॉकनिहाय कॅमेरा ट्रॅपिंग करावे लागणार आहे. ग्रीडमध्ये वाघाचा वावर असणाऱ्या पायवाटावर दोन्ही बाजूस कॅमेरा ट्रॅपिंग करावे लागणार आहे. प्रत्येक ग्रीडला २००६ च्या प्रगणनेत वापरलेला विशिष्ट कोट वापरावा लागणार आहे. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपिंग शक्य नाही, त्या ठिकाणी वाघांची विष्ठा गोळा करून वनकर्मचाऱ्यांना ती पृथ:करणासाठी पाठवावी लागणार आहे.

--------------------

कोट

राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची बैठक दोन दिवसांपूर्वीच पार पडली. यात व्याघ्र प्रगणनेचे चार टप्पे निश्चित करण्यात आले आहे. जून २०२१ ते जुलै २०२२ पर्यंत व्याघ्र प्रगणना होणार आहे. यात अद्ययावत प्रणालीचा वापर करण्यात येईल.

- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई