शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: June 7, 2014 23:38 IST

शहरातील दैनंदिन सफाईच्या मुद्यावरून कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीशी बजावण्यात आल्या आहेत. साफसफाईत सुधारणा न झाल्यास कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आयुक्तांचे आदेश : आरोग्य अधिकार्‍यांची कानउघाडणीअमरावती : शहरातील दैनंदिन सफाईच्या मुद्यावरून कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीशी बजावण्यात आल्या आहेत. साफसफाईत सुधारणा न झाल्यास कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाकण्याचा  इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे साफसफाईच्या ढिसाळ कारभारावरून आयुक्तांनी आरोग्य अधिकार्‍यांचीही कानउघाडणी केली.महापालिकेच्या ४३ प्रभागांत साफसफाईची कामे कंत्राट पध्दतीने सुरू आहेत. मात्र, काही महिन्यांपासून प्रभागात दैनंदिन साफसफाईची कामे व्यवस्थितरीत्या होत नसल्याची सदस्यांची ओरड आहे. इतकेच नव्हे, तर गत महिन्यात स्वत: महापौरांनी प्रशासनाला पत्र लिहून कंत्राट पध्दतीने होणार्‍या साफसफाईवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे पदाधिकारीसुद्धा हतबल झाले होते. साफसफाईविषयी सदस्यांनी कंत्राटदारांचे मत जाणून घेतले असता गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाने देयके काढल नसल्याने कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. मात्र, वेतन आणि साफसफाई हा भाग वेगळा असल्याचे मत महापालिका आयुक्त अरूण डोंगरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे स्वच्छतेच्या मुद्यावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे आदेशही त्यांनी सबंधितांना दिले. तीन सफाई कर्मचार्‍यांच्या वेतनात कपातमहापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी शुक्रवारी डोंगरे राजकमल चौक, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन परिसराची साफसफाईबाबत पाहणी केली. प्रभाग क्रं. १ उत्तर झोन अंतर्गत येणार्‍या महात्मा फुलेनगर, नवसारी, टॉवर कॉलनी लाईन परिसर, जवाहरनगर, राठी नगर, शेगाव, रहाटगाव, अर्जून नगर आदी ठिकाणी  आयुक्तांनी लहान मोठय़ा नाल्यांची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी देवेंद्र गुल्हाने यांच्यासह आरोग्य निरिक्षक उपस्थित होते. दैनदिन सफाईबाबत आयुक्तांनी शुक्रवारी केलेल्या पाहणी दौर्‍यात काही प्रभागात सफाई कर्मचारी कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे कामात हयगय केल्याप्रकरणी तीन सफाई कामगारांचे वेतन कमी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. यापुढे कामगार कमी आढळल्यास स्वास्थ निरीक्षक यांच्यावर निलंबनाची  कारवाई केली जाईल, असे आदेशित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर  कंत्राट रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देशसुध्दा त्यांनी दिले आहेत.