शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा, रवी राणा यांना हायकोर्टाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 21:07 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी जमीन वाटप प्रकरणात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आदींना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देसरकारी जमिनीचे प्रकरण चार आठवड्यात मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी जमीन वाटप प्रकरणात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, राज्याच्या महसूल विभागाचे सचिव, अमरावती जिल्हाधिकारी, अमरावती महापालिका आयुक्त, अमरावती विभागीय आयुक्त, राणा शिक्षण संस्था आदींना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.यासंदर्भात माजी खासदार आनंदराव अडसुळ, जयंत वंजारी व सुनील भालेराव यांनी जनहित याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राणा शिक्षण संस्थेला तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याकरिता मौजा पेठ येथील २.३९ एचआर (खसरा क्र. ४९/२) सरकारी जमीन वाटप करण्यात आली आहे. परंतु, त्या जमिनीचा सध्या दिल्ली पब्लिक स्कूलकरिता उपयोग केला जात आहे. जमिनीचा उपयोग बदलताना सरकारची परवानगी घेण्यात आली नाही. जमीन विविध अटींसह वाटप करण्यात आली होती. उपयोग बदलल्यास संस्थेचा जमिनीवर कोणताही अधिकार राहणार नाही असे सरकारने स्पष्ट केले होते. असे असताना केवळ खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या राजकीय संबंधामुळे ही जमीन संस्थेच्याच ताब्यात आहे. ही १०० कोटी रुपये किमतीची जमीन सरकारने ताबडतोब परत घ्यावी. त्यानंतर बांधकाम पाडून ती जमीन अन्य चांगल्या उपयोगासाठी वाटप करावी. जमीन वाटपाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा