शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

२१ संचालकांचा आदर्श उपविधी स्वीकारण्याची नोटीस

By admin | Updated: December 23, 2015 00:05 IST

अनेक वर्षांपासूनच्या २५ सदस्यीय संचालक मंडळात कपात करून संचालकांची संख्या कमी करून २१ वर आणणारा नवा उपविधी स्वीकारण्याची नोटीस जिल्हा बँकेला देण्यात आली आहे.

जिल्हा बँकेत राजकारणाला वेग : संचालक एकवटले, २८ ला चित्र होणार स्पष्टअमरावती : अनेक वर्षांपासूनच्या २५ सदस्यीय संचालक मंडळात कपात करून संचालकांची संख्या कमी करून २१ वर आणणारा नवा उपविधी स्वीकारण्याची नोटीस जिल्हा बँकेला देण्यात आली आहे. हा नवा उपविधी स्वीकारणे बँकेला जड चालले आहे. विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या नावे काढलेल्या नोटीसमुळे सहकार क्षेत्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. २३ नोव्हेंबर २०१५ रोजी विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये जिल्हा बँकेच्या उपविधीत सुधारणा करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे पाच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ २८ डिसेंबर २०१५ ला संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमिवर विद्यमान संचालक मंडळ उर्वरित ६ दिवसांच्या कार्यकाळात विभागीय सहनिबंधकांच्या पत्राला फारसे महत्त्व देणार नसल्याची शक्यता अधिक आहे. प्रतिनिधित्व कसे करणार? अमरावती : बँकेची २१ संचालक संख्या निर्धारित करणाऱ्या नव्या उपविधीतील काही तरतुदी विद्यमान २५ संचालकांपैकी बहुतांश संचालकांना मान्य नाही. त्याविरोधात काही संचालक उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. आदर्श उपविधीविरोधात बँकेचे विद्यमान संचालक उच्च न्यायालयात गेले असताना हे प्रकरण ‘न्यायप्रविष्ठ’ या सदरात मोडते. त्या पार्श्वभूमिवर विभागीय सहनिबंधकांनी काढलेल्या नोटीसला फारसे महत्त्व उरत नाही, असा कयासही बँकेतील धुरिणांनी व्यक्त केला आहे. दि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अस्तित्वात असलेल्या उपविधीप्रमाणे २५ सदस्यीय संचालक मंडळ कार्यरत आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने सन २०१३ मध्ये सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये मोठ्या प्रमाणात दुरूस्त्या केल्या. त्यात बँकेचे संचालक मंडळ २५ ऐवजी २१ संचालकांचे असावे, ही महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. २१ संचालकांसाठी बँकेला उपविधीत सुधारणा करणे क्रमप्राप्त आहे. मात्र ४ संचालक कमी होत असल्याने सहकारक्षेत्रातील अनेक दिग्गजांना हक्काच्या मतदारसंघापासून मुकावे लागणार आहे. यामुळे मध्यवर्ती बँकेवर प्रतिनिधित्वच मिळणार नाही, अशी भीती अनेकांना आहे. २१ या मर्यादित संचालक संख्येमध्ये विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळणार कसे, हा प्रश्न निर्माण झाल्याने बँकेच्या आमसभेने उपविधीतील सुधारणा एकमताने फेटाळली. भाजप-सेना युतीचे सरकार असताना राजकीय लाभ मिळविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक बसविण्याचे मनसुबे जिल्ह्यातील मातब्बरांकडून रचले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह आ. वीरेंद्र जगताप यांचे वर्चस्व असणाऱ्या या बँकेत मागच्या दाराने का होईना, पण प्रवेश मिळवावा, त्यासाठी २८ डिसेंबरला विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर मर्जीतील प्रशासक बसवावा, अशी खेळी सत्तापक्षातून रचली जात असल्याचा स्पष्ट आरोप बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केल्याने राजकारण तापू लागले आहे. (प्रतिनिधी)नोटीसमध्ये कारवाईची तरतूदबँकेच्या हिताच्या दृष्टीने सुधारणा विचारात घेण्याची विनंती करत नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ४५ दिवसाच्या आत आपल्या संस्थेच्या उपविधीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आदेश विभागीय सहनिबंधकांनी बँकेच्या अध्यक्षांना दिले आहेत. तसे करण्यास कसूर केल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १४ (२) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. चौघा दिग्गजांचे मतदारसंघ गोठवलेविद्यमान अध्यक्ष बबलू देशमुख, रविंद्र गायगोले, नितीन हिवसे, प्रकाश काळबांडे यांचे स्वतंत्र मतदारसंघ गोठविण्यात आले आहेत. २१ संचालकांसह अन्य सुधारणांचा उपविधी मंजूर झाल्यास बबलू देशमुख, रविंद्र गायगोले आणि नितीन हिवसे या तिघा विद्यमान संचालकांना परस्परांसमोर उभे ठाकावे लागणार आहे.नियमाच्या अधीन राहूनच बँकेला २३ नोव्हेंबरला नोटीस पाठविण्यात आली आहे. उपविधीच्या विशिष्ट तरतुदीविरोधात काही संचालक न्यायालयात गेले. इतर सुधारणा लागू करण्यावर स्थगिती नाही.- संगिता डोंगरे, विभागीय सहनिबंधकविभागीय उपनिबंधकांकडून नोटीस प्राप्त झाली आहे. बँकेचे संचालक मंडळ २१ वर मर्यादित करण्याविरोधात न्यायालयाकडून स्थगिती आल्याने आम्हाला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक.