शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

नोटपॅड, टॅबच्या जमान्यात पाटीचा पडला विसर

By admin | Updated: July 7, 2015 00:09 IST

पूर्वीच्या काळात दप्तर आणि पाटी विद्यार्थ्यांची खरी ओळख मानली जात असे.

विद्यार्थ्यांची खरी ओळख अडगळीत : अक्षरातूनच होतेय शैक्षणिक भविष्यरोशन कडू तिवसापूर्वीच्या काळात दप्तर आणि पाटी विद्यार्थ्यांची खरी ओळख मानली जात असे. मात्र संगणक युगात ही खरी ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसता येत नाही. मात्र या गिरवलेल्या अक्षरातूनच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आकाराला येत होते. नोटपॅड आणि टॅबच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहापुढे पालकांनादेखील पाटीचा विसर पडला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील विद्यार्थ्यांची खरी ओळख असणारी पाटी अडगळीत पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पाटीवर ‘अ ब क ड’, ‘ग म भ न’ काढून अभ्यासाचा श्रीगणेशा केला जात असे. मात्र संगणक युगात ही पाटी ‘कोरीच’ राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘क’, ‘ख’, ‘ग’ पासून पाढे, गणित या पाटीमुळेच विद्यार्थ्यांना समजत असत. आता या पाट्यांची जागा वह्या व टॅबने घेतली आहे. या पाटीवर सराव करता करता सुवाच्य अक्षराचा कित्सा आपोआप गिरवला जात होता. शाळा सुरु होण्यापूर्वीच शालेय साहित्याची खरेदी सुरु होते. या सर्व साहित्यामधून पाटी मात्र अडगळीत पडली आहे. याबाबत शालेय साहित्य विक्रेत्याला विचारणा केली असता पूर्वीच्या तुलनेत पाटीची मागणी कमी झाल्याचे सांगितले. आता विद्यार्थी पहिलीपासूनच पाटी वापरत नाहीत. बहुतांश विद्यार्थी वऱ्ह्या किंवा दोन वऱ्ह्यांचा वापर करीत आहेत. मराठी शाळांमधून अजूनही पहिली व दुसरीचे विद्यार्थी पाटीचा वापर करतात. या पाटीची काळजी घेतली जात असे. पाटी स्वच्छ करण्यासाठी कोश्याचा किंवा ओल्या रबरचा वापर केल्या जात असे. काही वर्षांनंतर पाटीचा वापर कमी कमी होत गेला. या पाटीचा संबंध मानवी जीवनाशी इतक जोडला गेला की, एखाद्याची पाटी कोरी राहिली, अशी म्हण रुढ झाली. आता मात्र ही पाटी खरोखरच कोरी राहणार आहे. पाटी रूपडे पालटते आहेकाळानुरुप पाटीसुद्धा आपले रूप पालटत आहे. सध्या बाजारपेठेत ४० रुपयांपासून पाट्या उपलब्ध आहेत. राजा स्लेट, साधी प्लेट असे दोन प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. सर्वांना जुनी खापराची पाटी आठवते. ही पाटीच सध्या दुकानातून नामशेष झाली आहे. दोन दशकांपूर्वी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात या खापराच्या पाटीपासून मुळाक्षरे गिरवून होत असे. मराठीची पाटी फुटलीअस्तित्वात असलेल्या मराठी शाळांना अव्हेरुन गल्लीबोळात इंग्रजी शाळा बोकाळल्या आहेत. शासनाने इंग्रजी शाळांना परवानगी देण्याचा सपाटा लावला आहे. पालकांना वेगवेगळी आमिषे दाखवून मराठी शाळांतील विद्यार्थी पळविण्याचा सपाटा या इंग्रजी शाळांनी लावला आहे. त्यामुळे मराठी शाळा दिवसेंदिवस ओस पडू लागल्या आहेत.