शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

शासकीय उपक्रम नव्हे, ही लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:30 IST

स्वच्छ सर्वेक्षण हा केवळ शासकीय उपक्रम राहता, ही लोकचळवळ झाली. नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेप्रति जागृती निर्माण झाली. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील ४८ शहरांना मागे टाकत अमरावतीला स्वच्छ शहर सर्वेक्षणात देशात ७४ वा क्रमांक मिळाला. गतवर्षी आपण १२२ व्या स्थानी होतो. राज्यात मागच्या वर्षी ३४ व्या, तर यंदा २१ व्या स्थानी राहिलो. हे सर्व टीमचे यश आहे. काम करत राहा, यश निश्चित मिळते, अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देआयुक्तांची ग्वाही : टीमचे यश, स्वच्छ सर्वेक्षणात शहर देशात ७४ व्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ सर्वेक्षण हा केवळ शासकीय उपक्रम राहता, ही लोकचळवळ झाली. नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेप्रति जागृती निर्माण झाली. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील ४८ शहरांना मागे टाकत अमरावतीला स्वच्छ शहर सर्वेक्षणात देशात ७४ वा क्रमांक मिळाला. गतवर्षी आपण १२२ व्या स्थानी होतो. राज्यात मागच्या वर्षी ३४ व्या, तर यंदा २१ व्या स्थानी राहिलो. हे सर्व टीमचे यश आहे. काम करत राहा, यश निश्चित मिळते, अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.यंदा सुरुवातीला इन्फ्रास्ट्रकचर, मनुष्यबळ कमी होते. याचा कोणताही बाऊ अथवा गाजावाजा न करता सर्वांनी सहकार्य केले आणि गतवर्षीपेक्षा यंदा चांगले मानांकन मिळण्याचा विश्वास सर्व सहकाऱ्यांनी दिला. त्याला अपेक्षेनुरूप यश मिळाले. पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी आणखी तयारी करू व यापेक्षाही अधिक यश संपादन करू, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसमध्ये थोडे कमी पडलो. यामध्ये आॅनलाइन प्रक्रिया होती. काही डॉक्युमेंटेशन आॅनलाइन झाले नाहीत. त्यामुळे थोडे माघारलो. मात्र, आता ही उणीव भरून काढली आहे. कचरा विलगीकरण व बायोमायनिंगची प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे. ओडीएफ प्लसमध्ये २०० पैकी २००, तर स्टार रँकिंगमध्ये सर्व ३५० गुण मिळाले आहे. आता प्रभागनिहाय कंत्राटदेखील मार्गी लागले आहे.स्पर्धेसाठी सर्व टीमने जागृती केली. एसएसआय, बीटप्यून यांनी मेहनत घेतली. सर्वांनी हिंमत दिल्याने हे यश मिळाले व मागील वर्षीच्या तुलनेत प्रतिकूल परिस्थितीत हे मिळाले असल्याचे आयुक्त म्हणाले.पत्रपरिषदेला उपायुक्त महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर व अभियानाच्या शहर समन्वयक डॉ. श्वेता बोके उपस्थित होत्या.अमरावतीकरांचे भरभरून सहकार्यअभियानासाठी अमरावतीकर नागरिकांनी उस्फूर्तपणे सहकार्य केले. शहर स्वच्छतेची जाणीव ही महत्त्वाची आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून या उपक्रमाला सहकार्य केले. विशेष म्हणजे, या स्वच्छ सर्वेक्षणात सिटीझन फीडबॅकसाठी १२५० गुण आहेत. यापैकी शहराला १०२८ गुण मिळाले आहेत. यामध्ये या अभियानाच्या शहर समन्वयक डॉ. श्वेता बोके यांचीही महत्त्वाची भूमिका राहिली, असे आयुक्त संजय निपाणे म्हणाले.