शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

फोटो आहे आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू; कोरोनाची भीती कायम अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कोरोनाची ...

फोटो आहे

आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू; कोरोनाची भीती कायम

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कोरोनाची रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. परंतु जिल्ह्यात अद्यापही २० टक्के शिक्षकांनी लसीकरण काय कोरोनाची टेस्टिंग सुद्धा केली नसल्याची बाब समोर आली आहे.शाळा सुरू होऊनही शिक्षकांनी कोरोना लसीकरण किंवा कोरोना टेस्टिंग केले नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास कोण जबाबदार राहील असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी काेरोना अद्याप संपलेला नाही. कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा मुलांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत संभ्रम आहे. शिक्षकांनी शाळेत जाण्यापूर्वी कोरोना लसीकरण किंवा टेस्टिंग करणे गरजेचे आहे. अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. परंतु याकडे अनेक शिक्षकांनी दुर्लक्ष केले एवढेच नाहीतर मुख्याध्यापकांनी सुद्धा शिक्षकांचे या कृतीकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

आठवीचे बारावीची एकूण शिक्षक -६२६

पहिला डोस झालेले शिक्षक -४२६

दुसरा डोस झालेले शिक्षक -२००

पहिल्या दिवशी टेस्टिंग केलेले शिक्षक -निरंक

ना टेस्टिंग, ना लसीकरण - २००

बॉक्स

पहिल्याच दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांचे एक साथ नमस्ते

शाळेच्या पहिल्या दिवशी आठवी ते बारावी तीन विद्यार्थ्यांनी शाळा प्रवेशाला समाधानकारक प्रतिसाद दिला. यावेळी शाळा महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन शिक्षकांनी स्वागतही केले. शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी उत्साहात दिसत होते. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ४,७४९ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी नमस्ते गुरुजीचा सूर काढला.

बॉक्स

पहिल्या दिवशी १८२ शाळा सुरू

शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे शाळा महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये ७४७ शाळांपैकी १८२ शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या आहेत.

बॉक्स

एका दिवसात चाचणी करायची कशी?

कोट

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी लसीकरण, कोरोना चाची करणे आवश्यक आहे. यात अनेक शिक्षकांनी लसही घेतली आहे. अशातच सध्या लसीकरणाची स्थिती लक्षात घेता एका दिवसात कोरोना चाचणी करायची कशी? चाचणी करायला गेलो तर शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागते. शिक्षकांसह विद्यार्थ्याचे शाळेत स्वतंत्र चाचणी व लसीकरण याची व्यवस्था करावी.

एल.एस वाटाणे

शिक्षक

कोट

शासनाने दिलेल्या सुचनेप्रमाणे व शिक्षण विभागाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतींने व ग्राम समितीच्या ठराव नुसार इयता आठवीचे वर्ग शाळेत सुरू केले आहेत. कोविड १९ च्या सूचनांचे काटेकोर पालन करून शैक्षणिक कार्य सुरू आहे. कोरोना लस घेतल्यानंतर शाळेवर हजर झालो आहे.

- रवि घवळे,

उच्चश्रेणी मुख्याध्यापक

कोट

शाळा उघडल्या असून, शिक्षक विद्यार्थी शाळेत जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी कोरोना चाचणी व लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या शिक्षकांनी चाचणी व लसीकरण केले नसेल त्यांनी प्राधान्याने करून घ्यावे.

- एजाज खान,

प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक