शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ना लसीकरण, ना कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग; तिसरी लाट रोखणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:13 IST

ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली, ग्रामीण भागात विशेष लक्ष देण्याची गरज अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या ...

ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली, ग्रामीण भागात विशेष लक्ष देण्याची गरज

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यातूनच कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाची गती मंदावल्याने आणि वैद्यकीय सुविधा तोकडी पडत असल्याने ग्रामीण भागात संभाव्य तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गतवर्षी एप्रिल महिन्यात आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च-एप्रिल महिन्यात बांधिताची संख्या वेगाने वाढली. एप्रिल महिन्यापासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. चाचण्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या स्थिर असल्याचे दिसून आले. मात्र त्याबरोबरच ग्रामीण भागात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील किमान २० ते ३० जणांची चाचणी होणे अपेक्षित आहेत. त्या तुलनेत कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. तथापि, एका महिन्यापासून मागणीच्या तुलनेत व प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीमही प्रभावी होत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर मध्येदेखील ऑक्सिजन,व्हेंटिलेटर बेडची सुविधा पुरेशी उपलब्ध नाही. काेरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे.

बॉक्स

ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गरजेचे !

१) ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव चांगलाच वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील किमान २० ते ३० जणांची चाचणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

२)ग्रामीण भागात आजघडीला दैनंदिन ५०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत. या सूत्रानुसार ग्रामीण भागात दैनंदिन किमान ६ ते ८ हजार दरम्यान चाचण्या अपेक्षित आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्यातच दैनंदिन ५ हजार ते ५५०० चाचण्या होत असल्याचे दिसून येत आहे.

३) कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामीण यंत्रणेला चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर किती जण संपर्कात आले होते, याची व्यवस्थित माहिती संबंधित रुग्णांकडून दिली जात नसल्याने चाचणीत अडचणी येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

४) ग्रामीण भागातील रुग्णांचा गृहविलगीकरणावर सर्वाधिक भर आहे. मात्र, ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय, स्वच्छतागृहाचा शक्यतोवर अभाव असतो. त्यामुळे सौम्य लक्षणे असणारा रुग्ण कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर वावरत असल्याने इतरांनादेखील संसर्ग होण्याची शक्यता असते.

बाॅक्स

लसीसाठी धावाधाव

प्राथमिक आरोग्य केंद्रांना आठवड्यातून दोनदा शंभर ते दीडशे डोस मिळत आहेत. कार्यक्षेत्रातील गावांच्या वाट्याला पन्नास-शंभर असा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची रस्सीखेच सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीसाठी वाददेखील होत आहेत. लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच रांगा लावत आहेत. १८ ते ४० वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी अत्यंत कमी आहे.

कोट

उपलब्ध पुरवठ्यानुसार ग्रामीण व शहरी भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. काँटॅक्ट ट्रेसिंगच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा आवश्यक उपाययोजना करत आहेत. नागरिकांनीदेखील सहकार्य करून योग्य दक्षता घ्यावी.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

बॉक्स

ग्रामीण भागात एकादिवसात ३ हजारावर चाचण्या

ग्रामणी भागात ११ मे रोजी आरोग्य विभागाने १४ तालुक्यात ३ हजार ९७६ चाचण्या घेतल्या आहेत.यामध्ये अमरावती तालुक्यात २१३,भातकुली १९६,मोशी ३६७,वरूड ४३०, अंजनगाव सुजी ३२४,अचलपूर ३६८,चांदूर रेल्वे २३७,चांदूर बाजार२४७,चिखलदरा ३०१,धारणी २३४,धामनगांव रेल्वे ३२१,तिवसा २५९ आणि नांदगाव खंडेश्र्वर २३६ याप्रमाणे चाचणीचे नमूने घेण्यात आले आहेत.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण रूग्ण -७८५४८

सध्या उपचार घेत असलेले रूग्ण -१०८५०

गृहविलगीकरणातील रूग्ण -८२०५

शहरातील रूग्ण -२९२६

ग्रामीण भागातील कोरोना रूग्ण -७६५६

बॉक्स

ज्येष्ठ नागरिक १६४२३०

४५ वर्षापुढील -१०३४६६

फ्रंट लाईन वर्कर्स-३०७३४

आरोग्य कर्मचारी -३०२५५

१८ ते ४४- १५८३९

बॉक्स

तालुकानिहाय ग्रामीण भागातील टेस्टिंग,पॉझिटिव्ह

अमरावती १०९९३-२०१७श

भातकुली १०३१५-११७९

मोशी २०५४२-३२५८

वरूड २१०८०-६१४२

अंजनगाव सुजी १८९३८-२८६०

अचलपूर ३३९६५-५४४३

चांदूर रेल्वे १३३०९-२०४९

चांदूर बाजार १७४५९-२२७४

चिखलदरा१०११७-११७४

धारणी १६१०९-२०९५

दर्यापूर २१४५२-१८९२

धामनगाव रेल्वे १८५१०-२३७१

तिवसा १८९१०-२६४१

नांदगाव खंडेश्र्वर १८०७९-१८०८