शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या अर्थकारणामुळेच कारवाई नाही

By admin | Updated: July 2, 2016 00:17 IST

अनेक खासगीे बसेसने पंचवटी व पीडीएमसी कॉलेज चौकात शिरकाव केला, हे नियमबाह्य आहे.

नागरिकांचा सवाल : अपघात झाल्यास जबाबदार कोण ?अमरावती : अनेक खासगीे बसेसने पंचवटी व पीडीएमसी कॉलेज चौकात शिरकाव केला, हे नियमबाह्य आहे. यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून बसेस शिरल्यावरही कारवाई होत नाही. याला बस मालकच्यावतीने पोलिसांना महिन्याकाठी मिळत असलेले अर्थकारणच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. यामुळे या मार्गावर मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील पंचवटी चौकात अनेक कंपनीच्या खासगी बसेस नियमबाह्य प्रवासी वाहतूक करतात. मागील दोन वर्षांपूर्वी या बसेस तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून शहराबाहेर काढल्या होत्या. पण अनेक महिन्यांपासून या बसेसने अवैधरीत्या शहरात शिरकाव केला असून येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे त्या दिवसभर उभ्या राहतात. इतर वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. यापूर्वी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी यामध्ये कोण दोषी आहे, ते तपासण्यात येईल व आरटीओची काय भूमिका आहे. या संदर्भात विचारणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पण पाच दिवस होऊनही कुठलीच कारवार्इंची दिशा ठरली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पोलीस आयुक्त जर गाडगेनगर वाहतूक पोलिसांना पाठीशी घालत असतील तर सामान्य जनतेने न्याय कुणाजवळ मागावा व हा प्रश्न कसा निकाली निघेल असे नागरिक आता बोलू लागले आहे. (प्रतिनिधी)आरटीओचे अधिकारीही निष्क्रीय नियमांचे उल्लंघन करुन नियमबाह्य प्रवासी वाहतूक खाजगी बसेस करीत असतील तर आरटीओच्या अधिकाऱ्यांनाही कारवाई करण्यांचा अधिकार आहे. या बसेस ला परवाना आहे. की नाह पार्र्सींग कठली आहे. परवाना नुतनीकरण केला आहे की नाही यासंदर्भात कारवाई करायला पाहिजे पण असे होत नाही ? त्यामुळे या खाजगी बसेसच्या चालकांवर कारवार्इंचा बडगा केव्हा उगारणार असा प्रश्न पडत आहे. खाजगी बसेस शहरात नियमबाह्य शिरल्या असतील व नियमांचे उल्लंघन करीत असतील तर त्याच्यांवर कारवाई करण्यात येईल. - श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी