शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या नवीन वास्तू निर्मितीला मंजुरी

By admin | Updated: September 19, 2015 00:04 IST

महापालिका प्रशासनाची नवीन प्रशस्त इमारत आता न्यायालय परिसरातील आयुक्तांचा बंगल्या शेजारच्या विस्तीर्ण जागेत स्थलांतरित करण्यास शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापौर चरणजित कौर नंदा यांनी मंजुरी दिली.

५० कोटींचा खर्च अपेक्षित : सभागृहाचा निर्णय, आयुक्तांना अधिकारअमरावती : महापालिका प्रशासनाची नवीन प्रशस्त इमारत आता न्यायालय परिसरातील आयुक्तांचा बंगल्या शेजारच्या विस्तीर्ण जागेत स्थलांतरित करण्यास शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापौर चरणजित कौर नंदा यांनी मंजुरी दिली. प्रशस्त आणि देखणी वास्तू साकारण्याकरिता सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पैसे उभारणीचे अधिकार आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना बहाल करण्यात आलेत, हे विशेष.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजित कौर नंदा यांच्या पीठासीनाखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसचिव मदन तांबेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाहिले. यावेळी स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी प्रस्ताव क्र.१४३ अन्वये शहराची वाढती लोकसंख्या बघता महापालिका प्रशासनाची प्रशस्त इमारत निर्माण व्हावी, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बहुतांश सदस्यांनी मते नोंदविताना राजकमल चौकालगत असलेली महापालिकेची मुख्य इमारत अपुरी पडत असल्याचे सांगितले. आयुक्त, उपायुक्त, अधिकाऱ्यांचे दालन, पदाधिकारी, महिला सदस्यांचे दालन तसेच वाहनतळाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. तर महापालिकेची इमारत असूनही ती दिसत नाही, हे शल्य आयुक्तांनी मांडलेलाखभर स्क्वेअर फूट जागेवर साकारणार वास्तूमहापालिका प्रशासनाची नवीन इमारत एक लाख स्क्वेअर फूट जागेवर निर्माण करण्याचा संकल्प आहे. यात आयुक्तांचा बंगला असलेल्या शिट क्र.१९ प्लॉट क्रमांक ७ हजार ५४३ चौ.मी. तर भूखंड क्रमांक ८ अंतर्गत १६०० चौ.मी. शाळेचा विस्तार अशा एक लाख स्क्वेअर फुट जागेचा समावेश आहे. सद्यस्थितीतील महापालिकेचे कार्यालय अडगळीच्या जागी आले आहे. वाहनतळ, दालनाची व्यवस्था नाही. कार्यालयांमध्ये सुसूत्रतता नाही. परंतु नवीन जागेत ही वास्तू निर्माण झाल्यास लोकांची होणारी गैरसोय टाळता येईल. - चरणजित कौर नंदा, महापौर, महापालिकाभविष्यात उद्भवणारी समस्या लक्षात घेता महापालिकेची नवीन वास्तू निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांनी होकार दिला, ही बाब महत्वाची आहे. -विलास इंगोले, सभापती, स्थायी समितीयापूर्वी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत कार्यरत महापालिका कार्यालय कोठे होते, हे कळू शकले नव्हते. महापालिका कार्यालय हे प्राईम लोकेशनमध्ये असावे, हा हेतू असल्याने कार्यालय स्थलांतरित करण्याला गती दिली. -चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका