शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीला रेती तस्करीला उधाण, महसूल बुडीत

By admin | Updated: November 23, 2015 00:18 IST

तालुक्यातील रेतीघाट बेवारस अवस्थेत असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे. नव्याने निविदा प्रक्रियेला सुरुवात...

भरारी पथक बेपत्ता : मेळघाटात रेती माफियांची चांदीधारणी : तालुक्यातील रेतीघाट बेवारस अवस्थेत असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे. नव्याने निविदा प्रक्रियेला सुरुवात व्हायचे असल्याने सध्या तापी, गडगा, सिपना व इतर लहान-मोठे नदी-नाले रेती तस्करांच्या रडारवर आहे. दररोज मध्यरात्री व भल्या पहाटे ट्रॅक्टर नदीनाल्यात उतरतात आणि रेती भरून गरजूंना पोहोचवित आहे. या रेती तस्करांची माहिती महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि कोतवाल व पोलीस पाटील यांना असतानाही ते तस्करांशी साटेलोटे करून राजस्व विभागाला चुना लावण्याचा काम करीत आहे. या कामात तर काही हलक्याचे तलाठींचे ट्रॅक्टर पार्टनरशिप तत्त्वावरच सुरू असल्याची माहिती आहे. या पार्टनरशिपची चर्चा गावात घर आहेच पण महसूल अधिकाऱ्यांपर्यंतसुद्धा याची माहिती आहे. परंतु सर्वांनी आपले आर्थिक हित साध्य करीत या अवैध व्यवसायाला खतपाणी घालीत आहेत.तस्करांवर नजर ठेवण्यासाठी तहसील स्तरावर भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली. मात्र भरारी पथके केवळ कागदावरच शोभा वाढविताना दिसून येत आहे. केवळ तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना मिळाल्यावर त्यांनी स्वत: कार्यवाही केल्यास रेती तस्कर सापडतात. अन्यथा उर्वरित कर्मचारी पकडून परस्पर विल्हेवाट लावण्यातच धन्यता मानीत आहेत.सध्या उतावली, चाकर्दा, कारादा या गावालगत सिपना नदीवरील तर राणीतंबोली, रोहणीखेडा, धुळघाट या गावाजवळील गडगा नदी आणि सोनाबर्डी, खाऱ्या, टेंभरू, बैरागड, कुटंगा या गावालगतच्या तापी नदीवरील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी सुरू आहे. धारणी शहरातही घराच्या बांधकामासाठी चोरट्या मार्गाने रेती आणली जात आहे. यासाठी मध्यरात्री व पहाटेची वेळ तस्करांनी निवडली आहे. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. रेती तस्करीला आळा घालण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)