अमरावती : येथील संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्थेची वार्षिक सभा नुकतीच आभासी पद्धतीने विलास पेठेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राजेंद्र टेम्बे यांनी संचालन केले. शुभदा पणजकर यांनी आभार मानले. सभेत विविध वियषांवर चर्चा करण्यात आली.
--------------------
उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
अमरावती : चांदूर रेल्वे येथील अशोक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या गलथान काराभाराविरुद्ध २५ जानेवारीपासून येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाणार आहे. उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे यांना निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती तपोविन पाटील यांनी दिली.
--------------------------
सिपना महाविद्यालयाची भरारी
अमरावती : चिखलदरा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी नितेश पारधे याची गुरूग्राम येथे सुरू असलेल्या खो-खो राष्ट्रीय शिबिरात निवड झाली आहे. नितेश हा नागपूर पोलिसांत कॉन्स्टेबल आहे. त्याने तीन वेळा अमरावती विद्यापीठातून कलर कोट पटकाविले. त्याचा यशाबद्दल संस्थेने कौतुक केले आहे.
-----------------------
समाजकल्याण कार्यालय मार्गावर अतिक्रमण
अमरावती : येथील समाजकल्याण कार्यालय मार्गावर अतिक्रमण असल्याने आदिवासी विकास विभाग कार्यालयाची संरक्षणभिंत निर्माण करण्यास अडथळा येत आहे. महापालिका, पोलीस प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले. तरीही हे अतिक्रमण कायम असल्याचे चित्र आहे.
----------------------------
‘ट्रायबल’ जात पडताळणीत गर्दी
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात वेळेपूर्वी प्रमाणपत्र मिळत नसल्याची ओरड आहे. सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी कास्ट व्हॅलिडिटी अनिवार्य असताना, संबंधित अधिकाऱ्यांचे नियोजन नाही. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांना आल्यापावली परत जावे लागत आहे.