शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात मद्यपींचा चाकूहल्ला

By admin | Updated: January 2, 2017 01:02 IST

नववर्षांच्या स्वागतावेळी मद्यपी युवकांनी हॉटेल शालमध्ये धुमाकूळ घालून व्यवस्थापकासह वेटरवर प्राणघातक चाकूहल्ला केला.

हॉटेल शालमधील घटना : व्यवस्थापकासह वेटर गंभीर अमरावती : नववर्षांच्या स्वागतावेळी मद्यपी युवकांनी हॉटेल शालमध्ये धुमाकूळ घालून व्यवस्थापकासह वेटरवर प्राणघातक चाकूहल्ला केला. व्यवस्थापक किशनसिंग गोवर्धनसिंग जाधव व वेटर सचिन सुरेश गाडे, असे जखमींची नावे आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी तीन आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला. पोलीस सूत्रानुसार, स्वराज मनोज देशमुख (१९,रा.हर्षराज कॉलनी), निशांत अकुंश सावंत (१९,रा. प्रशांत नगर) व रोशन रमेश गाढे (२१,रा. कॉटन ग्रिन कॉलनी) अशी आरोपींची नावे आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत हॉटेल व बार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री शहरातील बहुतांश हॉटेल आणि बार सुरु होते. शनिवारी मध्यरात्री १२.४५ वाजतादरम्यान गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल शालमध्ये आरोपी युवक हे मद्य प्राशनासाठी गेले होते. त्यांनी काऊन्टरवर आरडाओरड केल्याने व्यवस्थापकांनी आरोपींना हटकले असता त्यांनी व्यवस्थापक किशनसिंग जाधव यांच्यावर चाकुने हल्ला केला. तेथील वेटर सचिन गाडे याने विरोध केला असता त्यांच्यावरही चाकूहल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात व्यवस्थापकासह वेटर सचिन गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. दोघांनाही इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. वीरेंद्र भीमराव शहारे (रा.विलासनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून रविवारी तिघांना अटक केली. गणेश कॉलनीत कार पेटली अन्य एका घटनेत गणेश कॉलनीत उभ्या कारने पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. आतषबाजीमुळे कारच्या टायरनी पेट घेतल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.